21 April 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Calculator | पगारदारांनो! जर तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर किती लाख ग्रॅच्युइटी मिळेल? येथे जाणून घ्या Ration Card Rules | तुमचा डीलरही कमी रेशन देतो का? फक्त हे काम करा, 1 दिवसात लाईनवर येईल IRCTC Railway General Ticket | रेल्वे जनरल तिकिटाचे हे खास नियम लक्षात ठेवा, अन्यथा तिकीट असूनही मोठा दंड भरावा लागेल EPF Passbook | पगारदारांनो! तुमची बेसिक सॅलरी 10,000 रुपये, वय 30 वर्षे, निवृत्तीनंतर तुम्हाला किती लाख रुपये मिळतील पहा ATM Cash Withdrawal | एटीएममधून पैसे काढताना 'या' लाईटवर लक्ष ठेवा, अन्यथा खाते रिकामे होईल Baleno | मारुती बलेनो कार ठरतेय लोकांची खास पसंती! शोरूम'मध्ये बुकिंगला गर्दी, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका
x

जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं कर्तव्यावरील पोलिसाला चिरडलं

चंद्रपूर: जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं थेट कर्तव्यावरील पोलीस शिपायाला चिरडून मारल्याची धक्कादायक घटना नागपूर-चंद्रपूर महामार्गावर घडली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी २ व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरा म्हणजे ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे राज्यात तस्करांच्या वाढत्या मुजोरीचं वास्तव समोर आलं आहे.

यवतमाळहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका वाहनातून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा चेकपोस्टवर बॅरिकेडिंग उभ्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान, सदर जनावरांची तस्करी करणारं वाहन रात्री ११ वाजता चेकपोस्टवर आलं. त्याला स्थानिक पोलिसांनी अटकाव केला. परंतु, वाहन चालकानं वेग अधिक वाढवला आणि थेट एका शिपायाला चिरडून पास झाला. दरम्यान, याघटनेमुळे संबंधित शिपायाचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश मेश्राम असं या पोलीस शिपायाचं नाव आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपस सुरु आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x