29 April 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक
x

NDA: वाजपेयींना जमलं ते मोदींना जमलं नाही! शेर अकेला नाही, ते केवळ मार्केटिंगसाठी; ४० हुन अधिक मित्रपक्ष

नवी दिल्ली : काँग्रेससह देशभरातील एकूण २० प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी कोलकात्यात एकत्र येत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिलेल्या ‘मोदी हटाव, देश बचाव’ नाऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी खिल्ली उडवली खरी. तसेच केवळ माझ्या विरुद्ध देशातील सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत असा कांगावा मोदी जागोजागी करत आहेत.

दुसरं म्हणजे महागठबंधन’च्या नावाने एकत्र आलेले सर्व पक्ष माझ्याविरुद्ध नाही तर जनतेच्या विरुद्ध आहेत अशी भावनिक साद ते भाषणादरम्यान लोकांना घालत आहेत. परंतु, एनडीए असो किंवा आधीच युपीए यासर्व अनेक पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आघाड्या आहेत. लोकसभेच्या अनुषंगाने सर्व विरोधकांनी एकत्र येऊन नव्याने स्थापलेल्या महाआघाडीला मोदी जरी नावं ठेवत असले, तरी सध्या एनडीए’मध्ये किती पक्ष सामील आहेत हे मात्र सामान्य जनतेपासून लपवत आहेत.

आजच्या घडीला चंद्राबाबूंचा टीडीपी, शिरोमणी अकाली दल, राष्ट्रीय लोक समता पक्ष या पक्षांनी अधिकृतपणे एनडीए’ला सोडचिट्टी दिली आहे. शिवसेना जरी स्वबळावर लोकसभा निवडणुका लढविण्याच्या बाता करत असले तरी ते आजही एनडीए’चा भाग आहेत. त्यात आघाड्या आणि महाआघाड्या या काही मोदी सत्तेत आल्यावर देशात पहिल्यांदाच झालेल्या नाहीत. त्यामुळे मोठे पक्ष भाजपच्या मुठीत न राहिल्याने मोदींचा जळपळाट होताना स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शेर अकेला है, हा केवळ भावनिक मार्केटिंगचा भाग आहे असेच म्हणावे लागेल.

कोण आहेत आजही एनडीए’चा घटक पक्ष?

  1. बीजेपी
  2. शिवसेना
  3. लोकजन शक्ति पार्टी
  4. पत्तली मक्कल काची
  5. आल इंडिया एन. आर
  6. नागा पीपल
  7. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया
  8. बोडालैंड पीपल फ्रंट
  9. नेशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टी
  10. नेशनल पीपल पार्टी
  11. मिज़ो नेशनल फ्रंट
  12. जनता दल यूनाइटेड
  13. सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट
  14. राष्ट्रीय समाज पक्ष
  15. शिव संग्राम
  16. कोनगुनाडू मक्कल देसिया काची
  17. इंढिया जनानयज्ञ काची
  18. पुतिया निधि काची
  19. पीपल डेमोक्रेटिक अलायन्स
  20. महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी
  21. गोवा फॉरवर्ड पार्टी
  22. गोवा विकास पार्टी
  23. ऑल झारखंड स्टूडेंट् यूनियन
  24. इंडेजनियस पीपल फ्रंट ऑफ त्रिपुरा
  25. मणिपुर पीपल पार्टी
  26. कामतापुर पीपल पार्टी
  27. जम्मू कश्मीर पीपल कॉन्फ्रेंस
  28. केरला कांग्रेस(थॉमस)
  29. भारत धर्मा जन सेना
  30. जनथीपथिया संरक्षण समिति
  31. पीपल पार्टी ऑफ अरुणांचल
  32. यूनाइटेड डेमोक्रेटिक पार्टी
  33. हिल स्टेट पीपल डेमोक्रेटिक पार्टी
  34. प्रजा सोशलिस्ट पार्टी
  35. जनअधिपत्य राष्ट्रीय सभा
  36. केरल विकास कांग्रेस
  37. प्रवासी निवासी पार्टी
  38. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी
  39. केरला कांग्रेस(नेशनलिस्ट)
  40. पीपल डेमोक्रेटिक फ्रंट
  41. अपना दल

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x