26 April 2024 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा
x

ओबीसींच्या आरक्षणासाठी मी शिवसेना सोडली, शिवसेना अडचणीत?

पुणे : पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी भाषणा दरम्यान एक धक्का दायक खुलासा केला. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठीच मी शिवसेना सोडली. परंतु भुजबळांच शिवसेना सोडण्याचं कारण जर ओबीसी आरक्षण (मंडल कमिशनची अंमलबजावणी) होता याचा दुसरा अर्थ काय समजायचं अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरु होती. ओबीसी आरक्षणाला विरोध असणाऱ्या पक्षांमध्ये भुजबळांनी केवळ शिवसेनेचं नाव जाहीर पणे घेतल्याने ओबीसींमध्ये जो संदेश जायचा तो गेल्याचे चित्र दिसत होत. त्यामुळे शिवसनेच्या अडचणी निवडणुकीच्या तोंडावर वाढू शकतात.

कारण त्याचा दुसरा अर्थ शिवसेनेचा ओबीसी आरक्षणाला विरोध होता का अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरु होती. भुजबळ हे राजकारणात ओबीसींचा चेहरा म्हणून परिचित आहेत. मागील दोन वर्ष दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले आणि ही त्यांची त्यानंतरची पहिलीच जाहीर कार्यक्रमातील हजेरी असल्याने सर्व प्रसार माध्यमं छगन भुजबळ नक्की काय बोलणार याकडे लक्ष लावून होते.

दरम्यान भुजबळ जेंव्हा तुरुंगातून बाहेर आले तेंव्हा त्यांची अनेक पक्षातील नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या. महत्वाचं म्हणजे भुजबळ बाहेर येताच त्यांचे चिरंजीव पंकज भूजबळ यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. तसेच छगन भुजबळ यांची सामना मधून स्तुती सुद्धा करण्यात आली होती. इतकंच नाही तर भुजबळ शिवसेनेत असते तर संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहिला असता असा सामनातून लेख आला आणि त्यातून अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न झाला आणि भुजबळांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला गेला.

काही दिवसांपासून पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले छगन भुजबळ हे राष्ट्रवादीवर नाराज असून ते पुन्हां शिवसेनेत परतणार अशा बातम्या पेरण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी जवळजवळ तासभर भुजबळांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्या बातमीने अधिकच जोर धरला होता. परंतु त्या सर्व बातम्यांमधील हवाच भुजबळांनी आज राष्ट्रवादीच्या पुण्यातील हल्लाबोल यात्रेतील भाषणादरम्यान काढून टाकली.

उलट भाषणादरम्यान शिवसेनेला अडचणीत आणणारा खळबळ जनक दावा भुजबळांनी शिवसनेच्या संदर्भात अप्रत्यक्ष पने केला. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठीच मी शिवसेना सोडली. परंतु भुजबळांच शिवसेना सोडण्यामागचं कारण जर ओबीसी आरक्षण होत, तर याचा दुसरा अर्थ काय समजायचा अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरु होती.

आधीच मराठा आरक्षणासंदर्भात निघालेल्या विराट मराठा क्रांती मोर्चाची सामना या मुखपत्रातून खिल्ली उडविल्याने मराठा समाजाने प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. इतकच नाही तर त्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुखांनी मराठा समाजाची जाहीर माफी सुद्धा मागितली होती. परंतु मराठा समाजाने त्यांना माफ केलं की नाही हे निवडणुका जस जशा जवळ येतील तेव्हा स्पष्ट होईल. परंतु त्यात भुजबळांनी शिवसेना सोडण्यामागच कारण ओबीसी आरक्षण हे होतं असा धक्कादायक दावा केल्याने निवडणुकीच्या तोंडावर शिवसनेच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x