पुणे : मी जेव्हा एका सीआयडीच्या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याशी बोललो तेव्हा त्यांनी माहिती दिली की, जेव्हा अशा प्रकारची धमकीची पत्रे येतात तेव्हा त्याची वाच्यता प्रसार माध्यमांमध्ये केली जात नाही. तर थेट सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती देऊन सतर्क केलं जातं असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलेली धमकीची पत्रं ही निव्वळ स्टंटबाजी आहे अशी थेट टीका त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचला जात असल्याच्या बातम्या सत्ताधाऱ्यांनी केवळ सहानुभूतीसाठी जाणीवपूर्वक पसरविल्याचा आरोप शरद पवारांनी केला. इतकाच नव्हे तर ते धमकी पत्राच्या खरेपणावर सुद्धा त्यांनी शंका उपस्थित केली. भीमा – कोरेगाव हिंसाचार प्रकरणी नुकतीच काही जणांना अटक झाली होती. त्यानंतर झालेल्या झाडाझडतीत ती धमकीची पत्र सापडल्याचा दावा तपास करणाऱ्या पोलिसांनी केला होता.
पुढे पवार उपस्थितांना संबोधित करताना असं म्हणाले की, एल्गार परिषदेतील काही जणांना नक्षलवादी ठरवून अटक करण्यात आलं. तसेच भीमा – कोरेगाव हिंसाचारात कोण सामील होत, परंतु जे हिंसाचारात सहभागी नाहीत त्यांच्यावर सरकार कारवाई करत असून हा सत्तेचा दुरूपयोग असल्याचा आरोप सुद्धा पवारांनी केला.
