25 April 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

किरीट सोमैयांची 'आरोप पर्यटन यात्रा' कराडमध्येच संपली | पत्रकार परिषदेची शक्यता

Kirit Somiya

कराड, २० सप्टेंबर | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर किरीट सौमैया कोल्हापूरला यायला निघाले होते. मात्र राष्ट्रवादीने त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मात्र प्रशासन आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या अखेर कराड येथेच उतरले आहेत. कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी त्यांना विनंती केल्यानंतर ते आज पहाटे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कराड स्थानकात उतरले आहेत. माझे भांडण प्रशासनाशी नाही, त्यामुळे प्रशासन अडचणीत येत असेल तर मी येणार नाही, असा पवित्रा सोमैया यांनी घेतला. त्यामुळे आता कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये होणारा संघर्ष तात्पुरता टळला आहे, शिवाय राष्ट्रवादीचा मोर्चा सुद्धा आता रद्द झाला आहे. (Police stopped BJP leader Kirit Somaiya at Karad)

किरीट सोमैयांची ‘आरोप पर्यटन यात्रा’ कराडमध्येच संपली, पत्रकार परिषदेची शक्यता – Police stopped BJP leader Kirit Somaiya at Karad under prohibitory order :

पुन्हा कोल्हापूरला येणार – सोमैया
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर किरीट सोमैय्या आज(सोमवारी) कोल्हापूर दौऱ्यावर येत होते. कोणत्याही परिस्थितीत मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढणार असा पवित्रा घेत सोमैया यांनी घेतला आहे. त्यामुळे ते कोल्हापूरला येत होते. मात्र रविवारी रात्री कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांना जिल्हा बंदी केल्याबाबतची नोटीस काढली. शिवाय कोल्हापुरातील रेल्वे स्थानकाबाहेर सुद्धा रात्रीच मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू होती. त्यांचे आमच्या स्टाईलने स्वागत करू असा इशारा सुद्धा दिला होता. या संभाव्य वादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी त्यांना विनंती केल्यानंतर सोमैया कराड येथे पहाटे उतरले आहेत.

रेल्वेतून उतरल्यानंतर सोमैया सध्या कराड मधील शासकीय विश्रामगृह येथे थांबले आहेत. मात्र यावेळी त्यांनी पुन्हा दोन दिवसांनी कोल्हापूरला येणार आणि हा घोटाळा बाहेर काढणारच, असा स्पष्ट इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, यामुळे आता राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि भाजपमधील संघर्ष तुर्तास तरी टळला आहे. मात्र किरीट सोमैया यांच्या कोल्हापूरच्या दौऱ्याच्या ठाम भूमिकेमुळे हा वाद एवढ्यावरच मिटणार की आणखी काही वेगळे वळण लागणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल.

लोणावळा रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्ते दाखल, सोमय्यांचा सत्कार:
महालक्ष्मी एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर पोहोचली तेव्हा तिथे भाजप कार्यकर्तेही तिथे दाखल झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करत सोमय्या यांचं समर्थन केलं. तसेच काहिंनी सोमय्या यांचा सत्कार केला. यावेळी सोमय्या यांनी आपण कोल्हापुरात जाणारच, असं कार्यकर्त्यांना ठामपणे सांगितलं. विशेष म्हणजे लोणावळा रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते देखील जमले होते. त्यांनी भाजप विरोधात घोषणाबाजी केली.

काय आहे प्रकरण:
भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आरोप सोमैया यांनी केला. या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमैया यांनी केलेले माझ्यावरील आरोप चुकीचे असून त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती घेऊन घोट्याळ्याचा खुलासा करण्यासाठी किरीट सोमैया यांनी कोल्हापूरला जाण्याचे निश्चित केले होते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमैय्यांच्या दौऱ्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी सोमैया यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव करणारी नोटीस पाठवली. तरीही सोमैया हे रविवारी रात्री सीएसटीएम स्थानकातून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे निघाले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना कराडमध्ये ताब्यात घेतले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Police stopped BJP leader Kirit Somaiya at Karad under prohibitory order.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x