22 June 2024 9:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र सैनिकांकडून घरोघरी जाऊन स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी

MNS workers, screening and oxygen level counting, Kalyan Dombivli, Corona crisis

कल्याण, २० जुलै : मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेल्याने गेल्या १७ दिवसांपासून शहरात लागू असलेली टाळेबंदी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रामध्ये नऊ महापालिका येतात. त्यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि पनवेल महापलिकांचा समावेश आहे. मुंबई महपालिका क्षेत्रात दररोज अकराशे ते बाराशे करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या २० दिवसांपासून दररोज ४५० ते ५५० रुग्ण आढळून येत आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ हजार ६४० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९ हजार ३०७ रुग्ण हे २ ते १९ जुलै या कालावधीत आढळून आले आहेत. ठाण्यापेक्षा कल्याण-डोंबिवली रुग्णसंख्येत आघाडीवर असल्याचे चित्र आहे. याशिवाय, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्ण संख्येत कल्याण-डोंबिवली दुसऱ्या स्थानावर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता शहरातील कोरोना चाचण्या आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम प्रभावीपणे करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कल्याण डोंबिवलीतील बिकट परिस्थिती पाहता स्वतः महाराष्ट्र सैनिक योग्य ती सुरक्षेची खबरदारी घेत स्थानिक प्रशासनाच्या मदतीला उतरल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रसैनिक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता वाढत्या कोरोना रूग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मदत म्हणुन रस्त्यावर उतरले असून धारावी पॅटर्न सुत्रानुसार आता स्वतः घरा घरात जाउन प्रत्येक नागरीकांची स्क्रिनिंग, आॅक्सिजन लेवल तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच एखादा संक्षयीत रूग्ण आढळल्यास महापालिका प्रशासनाच्या मार्गदर्शन सुचीनुसार संबंधित रूग्णांचे विलगीकरण व मोफत चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना आपत्तीत राज ठाकरे यांचे कार्यकर्ते सामान्य लोकांसाठी अनेक शहरात समाज कार्य करताना प्रसार माध्यमांच्या नजरेस पडत आहेत.

 

News English Summary: In the Mumbai metropolitan area, Kalyan-Dombivali Municipal Corporation has reached the second position in the number of corona patients, with 450 to 550 infected people being found here daily for the last few days.

News English Title: MNS workers involved in screening and oxygen level counting in Kalyan Dombivli during corona crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x