23 September 2021 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करणे हा भाजपचा डाव - जयंत पाटील

Minister Jayant Patil

जळगाव, ०४ सप्टेंबर | ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणणे, त्यांना धमकावणे आणि त्यांची कोणत्याही प्रकारची चूक नसताना त्यांची बदनामी करण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे, हे आता सर्वांना माहिती झाले आहे, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. ते चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी जयंत पाटील आज चाळीसगावच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करणे हा भाजपचा डाव – ED being misused to target MahaVikas Aghadi leaders says minister Jayant Patil :

ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, अशी राष्ट्रवादीची देखील भूमिका आहे. त्यामुळे आता या विषयासंदर्भात कोणी काहीही वक्तव्य करणं योग्य नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनादेखील टोला लगावला.

राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 12 सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत असं सर्वाना वाटतंय, असंही त्यांनी सांगितलं.

जयंत पाटील यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत नुकसानग्रस्त मराठवाड्याकडे धाव घेतली असून आज चाळीसगाव, औरंगाबाद भागातील पूरपरिस्थितीची ते पाहणी करत आहेत. मागील दोन दिवसापूर्वी मराठवाडा आणि खानदेशात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: ED being misused to target MahaVikas Aghadi leaders says minister Jayant Patil.

हॅशटॅग्स

#JayantPatil(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x