23 April 2024 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा EPF Money Withdrawal | पगारदारांनो! EPF खात्यातून पैसे काढल्यावरही टॅक्स भरावा लागणार, कधी आणि किती ते लक्षात ठेवा
x

भाजपमध्ये तळागाळातील मूळ भाजपवासीयांकडे दुर्लक्ष करून इतर पक्षातून आलेल्यांना उच्च पद दिले जाते - बाबुल सुप्रियो

MP Babul Supriyo

कोलकाता, १९ सप्टेंबर | माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते. तसेच त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमध्ये तळागाळातील मूळ भाजपवासीयांकडे दुर्लक्ष करून इतर पक्षातून आलेल्यांना उच्च पद दिले जाते – BJP party other party leaders top posts ignoring real BJP old leader says MP Babul Supriyo :

मात्र आता भारतीय जनता पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो आणि भाजपा नेते स्वपन दासगुप्ता यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक पहायला मिळाली. बाबुल सुप्रियोच्या पक्षांतरामुळे त्यांच्या स्वतःच्या प्रतिमेला नुकसान पोहोचू शकते, असा दावा स्वपन दासगुप्तानी केला होता.

इतर पक्षातील नेत्यांना उच्च पद दिले जाते:
दरम्यान, या दाव्याला उत्तर देताना सुप्रियो म्हणाले, की भाजपामध्ये सामील झाल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला ज्यांना महत्वाची पदं देण्यात आली होती, त्या प्रतिस्पर्ध्यांबाबतही हेच खरं असावं. तसेच मी पक्ष बदलून इतिहास रचला आहे का? असं असेल तर भाजपमध्ये सुद्धा दुसऱ्या पक्षातून नव्यानं सामील झालेल्या ‘एकेकाळच्या प्रतिस्पर्ध्यां’च्या गळ्या भेटी घेतल्या गेल्या आहेत आणि त्यांना उच्च पदांवर बसवले गेले आहे. हे सर्व करताना जे भाजपचे तळागाळातील खरेखुरे लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. जर तुमचं म्हणणं आहे मी पक्ष बदलून माझी स्वत:ची प्रतिमा खराब करून घेतली आहे तर मग भाजपमध्ये आलेल्या लोकांची देखील प्रतिमा खराबच झाली असेल नाही का?’ असे ट्विट बाबुल सुप्रियो यांनी केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: BJP party other party leaders top posts ignoring real BJP old leader says MP Babul Supriyo.

हॅशटॅग्स

#MPBabulSupriyo(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x