Lok Sabha Election | भाजपप्रणीत एनडीए'ला INDIA आघाडी अजून धक्के देणार? भाजपच्या जुन्या मित्रांसोबत नितीशकुमार यांची चर्चा
Lok Sabha Election | मुंबईत तिसऱ्या बैठकीच्या तयारीत असलेली INDIA आघाडी आपली ताकद आणखी वाढवण्यात गुंतली आहे. पाटण्यातील पहिल्या बैठकीत १८ पक्ष होते आणि बेंगळुरूयेथील बैठकीत हा आकडा २६ पर्यंत पोहोचला आहे. आता INDIA आघाडी आपल्या आघाडीचा विस्तार करून एकेकाळी भाजपसोबत असलेल्या पक्षांना जोडण्याच्या तयारीत आहे.
पंजाबमध्ये अकाली दल आणि हरयाणात इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) हे हे पक्ष आहेत. नितीशकुमार यांनी अकाली दल आणि इनेलोशी संपर्क साधून त्यांना मुंबईतील बैठकीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिल्याचे समजते. इंडियन नॅशनल लोकदल आणि अकाली दल यांच्यात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.
याचे कारण म्हणजे ओमप्रकाश चौटाला आणि बादल कुटुंबीयांचे जवळचे राजकीय संबंध आहेत. अशा परिस्थितीत अकाली दल आणि इंडियन नॅशनल लोकदल एकत्र आले तर नवल वाटू नये असं म्हटलं जातंय. हे दोन्ही पक्ष यापूर्वी भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचा भाग होते. इतकंच नाही तर हरयाणात ही शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू असल्याचं वृत्त आहे. 25 सप्टेंबर रोजी चौटाला यांचे वडील आणि माजी उपपंतप्रधान देवीलाल यांची जयंती आहे. यानिमित्ताने कैथल जिल्ह्यात एका मोठ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. तेजस्वी यादव आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल हेही यात सहभागी होणार आहेत.
मुंबईच्या बैठकीपूर्वी नितीशकुमार काय म्हणाले?
रविवारी नितीशकुमार म्हणाले होते की, मुंबईच्या बैठकीत आणखी काही पक्ष आमच्यासोबत असतील. शेतकरी आंदोलनादरम्यान अकाली दलाने भाजपशी फारकत घेतली होती. इतकंच नाही तर पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत दोघांमध्ये एकजूट झाली नाही. अकाली दलाने बसपासोबत युती करून निवडणूक लढवली होती, पण त्यांना यश आले नाही. सुखबीर बादल आणि प्रकाशसिंग बादल यांच्यासारख्या नेत्यांनाही आपल्या जागा गमवाव्या लागल्या. अशा परिस्थितीत अकाली दलालाही सोबतीची गरज आहे, त्यांना INDIA कसं एकत्र आणणार ते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
News Title : Lok Sabha Election INDIA Alliance with more partners check details on 30 August 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC