10 May 2024 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर्स बायबॅक करणार, गुंतवणुकदारांना प्रती शेअर बक्कळ फायदा होणार, डिटेल्स जाऊन घ्या

L&T Share Price

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या नागरी बांधकाम कंपनीने नुकताच 10,000 कोटी रुपयेची बायबॅक योजना जाहीर केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 12 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. 12 सप्टेंबर 2023 पर्यंत लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर धारक बायबॅक योजनेच्या कक्षेत येतील. (L&T Shares Buyback)

लार्सन अँड टुब्रो कंपनीने या बायबॅकसाठी प्रति शेअर 3,000 रुपये किंमत जाहीर केली आहे. या बायबॅकच्या माध्यमातून कंपनी 3.3 कोटी शेअर्स पुन्हा खरेदी करणार आहे. आज बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 2,732.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लार्सन अँड टुब्रो कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार स्टॉक लिस्टिंगनंतर हा कंपनीने जाहीर केलेला हा पहिला बायबॅक असणार आहे. आणि या बायबॅकसाठी लार्सन अँड टुब्रो कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून शेअर्स खरेदी करणार आहे. कंपनी आपल्या रोख अधिशेषाद्वारे या बायबॅक योजनेची पूर्तता करणार आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनी निविदा ऑफरद्वारे बायबॅक लाँच करत असून याचा गुंतवणुकदारांना जबरदस्त फायदा होणार आहे.

सध्याच्या बाजार किमतीनुसार या बायबॅकमधून गुंतवणूकदारांना प्रती शेअर 396 रुपये नफा मिळू शकतो. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 2694.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. लार्सन अँड टुब्रो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,78,752.05 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2767 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1798 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price today on 30 August 2023.

हॅशटॅग्स

L&T Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x