26 September 2020 9:19 PM
अँप डाउनलोड

प्रचारात 'ये मोदी हैं, जवाब जरूर देगा' आणि पत्रकारपरिषदेत 'अध्यक्षजी जवाब देंगे'!

Narendra Modi, Amit Shah, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताना दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींनी प्रसार माध्यमांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. या पत्रकार परिषदेत मोदींसोबत अमित शहा आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र जर पत्रकार परिषदेत मोदींना प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरच द्यायची नव्हती तर त्यांनी येथे हजेरी तरी का लावली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, अमित शाह यांनी भाजप सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला आणि प्रचाराबाबतची माहिती दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी मोदींना प्रश्न विचारताच ‘अध्यक्षजी जवाब देंगे’ असं उत्तर देत स्वतःचा बचाव केला आणि जवाबदारी झटकल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणबाजीत टाळ्या प्राप्त करण्यासाठी पाकिस्तानचं नाव काढत ‘ये मोदी हैं, जवाब जरूर देगा’ अशा बाता मारणाऱ्या मोदींची देशातील पत्रकार परिषदेत काही न बोलताच दांडी गुल झाल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे ५ वर्षात पत्रकार परिषद घेण्यास घाबरणाने मोदी अखेर पर्यंत तो विक्रम कायम ठेवण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. कदाचित शेवटच्या क्षणी ते असं काही तरी बोलण्याच्या ओघात बोलून जायचे की त्याचा लोकसभा मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मोठा फटका बसायचा अशी भीती भाजपलाच असावी अशी कुजबुज सुरु झाली आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Amit Shah(240)#Narendra Modi(1318)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x