27 July 2021 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा

without stress life do changes in day to day life

मुंबई ८ मे :आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नवनवीन आरोग्य समस्या डोकं वर काढू लागल्या आहेत. खरंतर पूर्वी जगण्यासाठी लागणाऱ्या सुख-सुविधा कमी होत्या मात्र तरीही जीवन सुखी आणि समाधानी होते. आताच्या आधुनिक जगात सोयी-सुविधा भरपूर प्रमाणात उपलब्ध असूनही जीवनातील शांतता कमी झाली आहे. जगाच्या वेगाने धावताना कामाचा ताण, टारगेट पूर्ण करण्याचं टेंशन, ब्रेकअपचं दुःख, मुलांच्या भविष्याची चिंता, आर्थिक नियोजनाची काळजी अशा अनेक गोष्टींचा ताण येऊ लागला आहे. त्यामुळे ताण-तणाव निर्माण करणाऱ्यासाठीअगदी एखादी छोटीशी गोष्टही कारणीभूत ठरू शकते. शिवाय प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या निराळी असल्यामुळे दुःख, चिंता, काळजीची कारणंही निरनिराळी असू शकतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जर आपण आपल्या दिनचर्येत थोडासा बदल केला तर इच्छाशक्तीद्वारे तुम्ही ताणावर नियंत्रण मिळवू शकता… जाणून घ्या त्यासाठीच काही टिप्स…

* ताण (Stress) – तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यायामाला महत्त्वाचं स्थान द्या. व्यायाम केल्यानं ताण कमी होण्यास मदत मिळते. जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी वॉकला जा…

* जर आपण एखाद्या आजारानं किंवा शरीरातील बदलामुळं तणावग्रस्त आहात. तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उदा. डोक्यावर केस गळत आहेत, याचं टेंशन तुम्ही घेतलं असेल तर काळजी करण्यापेक्षा त्यावर उपाय करा, हेअर ट्रांसप्लांट करा, औषधं घ्या आणि प्राणायाम करात. जेवणात प्रोटीन असलेले पदार्थ असू द्या.

* जर आपल्या सोबत काहीसं असं घडत असेल, ज्याचा विचार करून आपला ताण वाढतोय. तर आपल्या आयुष्यातील या नकारात्मक घटना दूर सारा आणि त्याचा विचार न करता चांगल्या गोष्टींचा विचार करा.

* जर नवरा-बायकोच्या नात्यात ताण-तणाव असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत किंवा घरातील मंडळींसोबत चर्चा करा. आपण यासाठी मॅरेज काउंसलरची मदत घेऊ शकता.

* मेडीटेशन अर्थात ध्यान करण्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकेल. योगासन आणि ध्यानधारणेमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते.जर तुम्हाला मेंटल प्रेशरपासून दूर राहायचे असेल तर नियमित मेडीटेशन करा.

* संगीतमध्ये कोणतेही दुःख विसरण्याची ताकद असते. शांत म्युझिक अथवा आवडीची गाणी ऐकल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होऊ शकतो.
डोळे बंद करून थोडावेळ एका वेगळ्याच दुनियेचा अनुभव घ्या. यामुळे तुमचं मेंटल प्रेशर अवश्य कमी होईल.

* ऑफिसचे काम शक्य झाल्यास ऑफिसमध्येच करा. काही लोकांना कामाचा ताण ऐवढा असतो की ते ऑफिसचे काम घरी घेऊन जातात.ऑफिसमधील काम, घरातील काम आणि सामाजिक काम अशा तीन स्थरांवर माणूस काम करत असतो. त्यामुळे जे काम जेव्हा कराल तेव्हा ते प्रामाणिकपणे करा. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच कामाचा ताण येणार नाही.

News English Summary: In today’s stressful life, new health problems are on the rise. In fact, in the past, the comforts of life were scarce, but life was happy and content. In today’s modern world, despite the abundance of conveniences, the peace of life has diminished. As the world moves faster, the stress of work, the tension of meeting targets, the grief of breakup, the anxiety of children’s future, the worry of financial planning are starting to come.

News English Title: implementation of changes in daily life for living without stress news update article

हॅशटॅग्स

#Health(643)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x