14 December 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

आरोग्य मंत्री म्हणतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी | टाटा इन्स्टिट्युट म्हणतं लाट येणार

Slight possibility, Corona wave, Health Minister Rajesh Tope, Tata Institute

मुंबई, २ नोव्हेंबर: गेल्या महिन्यात अगदी शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा उचल घेत असल्याचं समोर आलं आहे. असं असलं तरी मृत्यू दर मात्रं कमी होताना दिसत आहे. मृत्यू दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना मोठं यश आल्याचं म्हटलं गेलं.

परंतु, पावसाळ्यात कोरोना मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढेल असं म्हटलं गेलं. त्यानंतर हिवाळ्याचे संकेत येताच पुन्हा तसेच निष्कर्ष वर्तविण्यात येतं आहेत. परिणामी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येणार असं म्हटलं जातंय का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. परंतु, महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केलं आहे.

दरम्यान, दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेची पूर्ण तयारी झालेली आहे असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या बाजूला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं टाटा इन्स्टिट्यूटच्या तज्ज्ञांनी म्हटल्याचे वृत्त आहे. टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR)च्या तज्ज्ञांनी यासाठी दिवाळीनंतरचा काळ महाराष्ट्रात अत्यंत धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

 

News English Summary: Though there is a possibility of a second wave, the Maharashtra government’s health system is fully prepared to deal with the situation, said Rajesh Tope. On the other hand, experts from the Tata Institute have reported that another wave of corona will hit Mumbai, the country’s financial capital. Experts from the Tata Institute of Fundamental Research (TIFR) have concluded that the post-Diwali period is extremely dangerous in Maharashtra.

News English Title: There is slight possibility of second corona wave in Maharashtra says Health Minister Rajesh Tope News Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x