2 July 2020 9:06 PM
अँप डाउनलोड

बारावी निकालात मुलींची बाजी, कोकण टॉप, सरासरी निकाल ८५.८८ टक्के

Maharashtra HSC Board

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. विभागनिहाय आकडेवारीत कोकण अव्वल स्थानी आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्यातील तब्बल ४४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा १२ वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ४२ हजार ९१९ तर विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ४८ हजार १५१ इतकी होती.

विभागनिहाय निकाल

  1. कोकण ९३.२३ टक्के
  2. पुणे ८७.८८ टक्के
  3. अमरावती ८७.५५ टक्के
  4. औरंगाबाद 87.29 टक्के
  5. कोल्हापूर ८७.१२ टक्के
  6. लातूर ८६.०८ टक्के
  7. नाशिक ८४.७७ टक्के
  8. मुंबई ८३. ८५ टक्के
  9. नागपूर ८२.५१ टक्केशाखेनुसार विचार करता यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९२. ६० टक्के, वाणिज्य शाखेचा ८८. २८ टक्के आणि कला शाखेचा निकाल ७५.४५ टक्के लागला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Maharashtra(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x