13 August 2022 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Buying | कमी पैशात खरेदी करा मोठा फ्लॅट, बुकिंग करण्यापूर्वी या फॉर्म्युल्यासह करा वास्तविक क्षेत्रफळाची गणना Ratna Jyotish | आर्थिक तंगीत अडकलेल्यांना अर्थसंपन्न करेल हे शुभं रत्न, आर्थिक भरभराटीसाठी फायदेशीर अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

धक्कादायक! ४ राज्यात अनेक जागांवर एकूण मतदानापेक्षा जास्त मतं आढळली: न्यूज क्लिकचा रिपोर्ट

Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. त्यातील अजून एक मतमोजणी बाबतचा खुलासा म्हणजे देशातील एकूण ४ राज्यांमधील अनेक मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाच्या आकड्यापेक्षा हजारोने मतं मतमोजणीत अधिक मिळावी आहेत. म्हणजे संबंधित लोकसभा मतदासंघ आणि तिथे जाहीर झालेली एकूण मतांची आकडी आणि प्रत्यक्ष मतमोजणीत जाहीर झालेला एकदा एकूण मतांचा आकडा हजारोने अधिक आहे. त्यामुळे सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि तास रिपोर्ट न्यूज क्लिकने प्रत्यक्ष तपासाअंती दिला आहे.

विशेष म्हणजे यामध्ये देशातील हाय प्रोफाइल मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामध्ये बिहारमधील पाटणा साहिब, जहानाबाद आणि बेगुसराय या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर न्यूज क्लिपकने मतमोजणी संबंधित शोध मोहीम हाती घेतली होती आणि त्यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमधील एकूण मतांची आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीत प्राप्त झालेली आकडेवारी यामध्ये हजोरोचा फरक असून प्रत्यक्ष मोजणीतील मतांची आकडेवारी ही हजारोने अधिक आहे.

दरम्यान, ईव्हीएम मशीनमधील मूळ प्रोग्राममध्ये बदल करून ही आकडेवारी बदलण्यात आल्याचा आरोप यादी देखील अनेकांनी केला होता. मात्र मुख्य निवडणूक अयोग्य यात सखोल जाण्यासच तयार नसल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईट’वरील आणि निवडणूक आयोगाच्या अँप वरून मिळालेल्या माहितीनुसार २० लाख ५१ हजार ९०५ मतदार असलेल्या पाटणा साहिब या लोकसभा मतदारसंघात ४६.३४ मतदान झालं. त्यानुसार तेथे एकूण ९ लाख ५० हजार ८५२ मतं असणं अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीत ९ लाख ८२ हजार २८५ मतदान मोजण्यात आलं. म्हणजे प्रत्यक्ष एकूण मतदानाच्या ३१ हजार ४३३ मतं जास्त मोजणीत मिळाली. विशेष म्हणजे भाजप उमेदवार येथून तब्बल २ लाख ८४ हजार मतांनी विजयी झाले. त्यामुळे हेच प्रकार देशातील अनेक मतदारसंघात झाले असणार असं सूचित होत आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन मधील आउटपुट प्रोग्रॅम सोयीनुसार सुनिश्चित करण्यात आला आहे हेच सिद्ध होते आहे. त्यासाठी इव्हिम आणि त्यातील इनपुट आणि आउटपुट संबधित बातमी येथे सविस्तर वाचा. (येथे क्लिक करा)

संबंधित वृत्त इंडियन एक्सप्रेसच्या जनसत्ता.कॉम’ने देखील प्रसिद्ध केलं आहे आणि त्याचा पुरावा येथे देण्यात येतो आहे आणि तो देखील वाचकाने वाचावा. (येथे क्लिक करा)

हॅशटॅग्स

#Amit Shah(262)#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x