8 July 2020 5:00 PM
अँप डाउनलोड

हा देश लोकांपासून बनतो, जमिनीच्या तुकड्यांपासून नाही: राहुल गांधी

Congress, Rahul Gandhi, Article 370, Jammu Kashmir

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करुन या राज्याला केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सोमवारपासून केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयावर अनेक स्तरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अखेर 24 तासानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या या निर्णयावर आपलं मौन सोडलं आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

सत्ताधाऱ्यांकडून राज्यघटनेचं उल्लंघन होत असल्याची टीका करताना राहुल गांधी यांनी काही निवडक लोकप्रतिनिधींना कारागृहात टाकलं जात असल्याचं म्हटलं आहे. “हा देश लोकांपासून बनतो, जमिनीच्या तुकड्यांपासून नाही. तसंच या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रला एकसंघ ठेवण्यासाठी लोकांची गरज लागते जमिनीचे तुकडे करुन राष्ट्र उभं राहत नाही. लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जेलमध्ये टाकून संविधानाचं उल्लंघन केलं गेलं. जम्मू काश्मीरचे तुकडे करुन राष्ट्रीय एकात्मता मजबूत केली जाऊ शकत नाही असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारने सोमवारी कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने राज्यसभेत जोरदार विरोध केला. त्यानंतर आज राहुल गांधी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. ‘एकतर्फी निर्णयाने जम्मू-काश्मीरचे विभाजन करणे, लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकणे आणि राज्यघटनेचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकता साधता येते का,’ असा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x