28 April 2024 5:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी | 2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी - रामदास आठवले

Loksabha Election 2024

मुंबई , १३ जून | केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास आठवले शैलीत विरोधकांना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नादी न लागण्याचा सल्ला दिलाय. ते इथंच थांबले नाही तर 2024 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील हे सांगताना मोदी आंबेडकरवादी असल्याही दावा केला. ते प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील संविधान निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

“प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी
2024 मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी
मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी?”

रामदास आठवले म्हणाले, “प्रशांत किशोर हे 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते, तरीही 2019 च्या निवडणुकीत 303 जागा मिळवत मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही त्या राज्यांमध्येही भाजपला विजय मिळालेला आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे प्रशांत किशोर यांच्या कोणी नादी लागू नये. कारण 2024 मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान बनणार आहेत.”

 

News Title: Ramdas Athawale talked on Sharad Pawar and Prashant Kishor meet over Loksabha Election 2024 news updates.

हॅशटॅग्स

#Prashant Kishore(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x