26 April 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

जुन्या नाण्यांचे कलेक्शन आहे? | मग तुम्ही कमाऊ शकता लाखो रुपये - सविस्तर वृत्त

Old Indian Coins Auction

मुंबई , १३ जून | वस्तू जसजश्या जुन्या होत जातात तसतसा आपण त्याचा वापर थांबवत जातो. सर्वसाधारणपणे वस्तू जुन्या झाल्या की त्याचे मूल्य संपते किंवा कमी होत जाते. मात्र काही वस्तू जितक्या जुन्या होत जातात तितके त्यांचे मूल्य वाढत जाते. कारण या वस्तू दुर्मिळ वस्तू किंवा अॅंटिक वस्तूंच्या श्रेणीत येतात. अशा वस्तूंना जगभरातून मोठी मागणी असते. या वस्तूंसाठी दर्दी लोक वाटेल ती किंमत मोजायला तयार असतात. तुमच्याकडे जर जुन्या नाण्यांचे कलेक्शन असेल तर तुम्हाला लाखो रुपये कमावण्याची संधी आहे. या जुन्या वस्तूंची काही निश्चित किंमत नसते. विकणारा आणि खरेदी करणारा यांच्यावर ही किंमत अवलंबून असते. बंगळूरू स्थित ऑनलाईन मार्केट व्यासपीठ असलेले क्विकर आपल्या व्यासपीठावर चलनातून बाद झालेल्या मात्र जुन्या नाण्यांची विक्री करते आहे.

क्विकरच्या या व्यासपीठावर देशातील कानाकोपऱ्यातून लोक आपले जुन्या नाण्यांचे आणि वस्तूंचे कलेक्शन नोंदवत आहेत आणि त्यांची विक्री लाखो रुपयांना होते आहे. क्विकर देशातील जवळपास एक हजार लहान मोठ्या शहरांमध्ये विस्तारलेले आहे. क्विकरवर अॅंटिक नाण्यांची विक्री चक्क लाखो रुपयांना होते आहे. जर तुमच्याकडे किंवा तुमच्या परिचितांमध्ये कोणाकडे जुन्या नाण्यांचे कलेक्शन असेल तर क्विकर जा आणि त्याला विका आणि लाखो रुपये कमवा.

२ रुपयांचे जुने नाणे ९ लाख रुपयांना:
क्विकर (Quikr)च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, १९९४ मध्ये तयार करण्यात आलेले २ रुपयांचे नाणे वेबसाईटवर ९ लाख रुपयांना विकले जाते आहे. दिल्लीत राहणाऱ्या कुलवंत सिंह यांनी ही पोस्ट केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीव्यतिरिक्त चेन्नई, बंगळूरू आणि उधमपूर येथेही ही पोस्ट करण्यात आली आहे. सर्व नाणी १९९४मधील भारतीय झेंडा असणारी आहेत. सर्वांनीच या नाण्याची किंमत ९ लाख रुपये ठेवली आहे.

पंडित जवाहर लाल नेहरूंचा फोटो असलेली नाणी ६ लाख रुपयांना:
बंगळूरू येथील डॉक्टर दीपा, १ रुपया आणि २ रुपयांचे नाणे ६.३० लाख रुपयांना विकत आहेत. १ रुपयांच्या नाण्यावर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो आहे. हे नाणे २ लाख रुपयांना विकले जाते आहे. तर २ रुपयांचे नाणे ४.२० लाख रुपयांना विकले जाते आहे.

 

News Title: If you have collection of old coins then you have opportunity to earn lacs rupees news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x