20 June 2021 10:01 PM
अँप डाउनलोड

येडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद २४ तासात जाऊ शकत जर ?

कर्नाटक : येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी परंतु येत्या २४ तासात त्यांना सर्वोच्च न्यायालयात बहुमताचा आकडा सिद्ध करता आला नाही तर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागणार आहे. त्यामुळे अल्पमतात असताना येडियुरप्पांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्यासमोर बहुमत सिद्ध करण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पा यांना येत्या २४ तासांत ११२ आमदारांच्या पाठिंब्याची यादी आणि पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उद्या शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत येडियुरप्पांना ११२ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर सुप्रीम कोर्टात सादर करावी लागणार आहे. सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला ११२ समर्थक आमदारांचा आकडा आणि त्याची जुळवाजुळव वाटते तितकी सोपी नाही.

सध्या भाजपाकडे १०४ आमदार असून जरी त्यांना २ अपेक्षा आणि एका बसपा आमदाराने जरी पाठिंबा दिला तरी हा आकडा १०७ वर जातो. तरी सुद्धा अजून ५ आमदारांची जुळवाजुळव करणं भाजपसाठी आणि येडियुरप्पांनसाठी सोप्पं राहिलेलं नाही. त्याचाच भाग म्हणजे गेल्या २४ तासापासून काँग्रेसचे ४ आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे आता येडियुरप्पा उद्या सकाळी १०.३० पर्यंत सुप्रीम कोर्टात बहुमत सिद्ध करणारे पुरावे सादर करतात का ते बघावं लागेल. तसे न झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावे लागू शकते आणि भाजपवर मोठी नामुष्की ओढवू शकते.

हॅशटॅग्स

#Congress(496)#Narendra Modi(1593)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x