26 October 2021 5:32 AM
अँप डाउनलोड

मराठा आरक्षण; आक्रमक आंदोलक महिलांनी शिवसेना आमदार मिणचेकरांना बांगड्या दाखवल्या

हातकणंगले : सर्व पक्षामध्ये मराठा आरक्षणावरूनसर्वाधिक नाचक्की शिवसेनेचीच होताना दिसत आहे. आधी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चातील आक्रमक कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत अक्षरशः हाकलून दिल होत. आता शिवसेनेचे आमदार मिणचेकर हे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले असता त्यांना आक्रमक आंदोलक महिलांनी आमदार सुजित मिणचेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हात वर करून बांगड्या दाखवल्या.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मराठा महिलांनी आक्रमक पवित्रा घेत थेट शिवसेना आमदार मिणचेकर यांना बांगड्या दाखवत खडे बोल सुनावले. या आक्रमक महिलेने म्हटलं कि,’ जे आमदार, राज्यकर्ते निष्क्रिय आहेत त्यांना आम्ही बांगड्यांचा आहेर पाठवतो, बांगड्या भरा आणि घरात बसा असा हात वर करत ठणकावून सांगितलं.

त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार सुजित मिणचेकर म्हणाले की, तसा राजीनामा देता येत नाही आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या परवानगीनेच पुढची कारवाई करावी लागेल असं वेळ मारून नेणार उत्तर दिल आणि त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला.

हॅशटॅग्स

#Shivsena(1152)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x