23 April 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार SBI Salary Account | SBI बँक सॅलरी अकाउंटचा घ्या फायदा, अनेक चार्जेस पासून होईल सुटका Quant Mutual Fund | शेअर्स नको? या 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, जलद पैसा वाढवा Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची विशेष योजना, दरमहा बचतीवर खात्रीने मिळेल 80,000 रुपयांचा परतावा
x

व्हिडिओ; नमो भक्ताला मनसेच्या महिलांनी ऑफलाईन घेरताच उडाली घाबरगुंडी, सगळं कबूल केलं

बदलापूर :  विवेक भागवत या नमो भक्ताने काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर अत्यंत गलिच्छ भाषेत एकामागोमाग एक पोस्ट टाकल्या होत्या. परंतु, मनसे कार्यकर्त्यांकडून त्याला फेसबुकवर धारेवर धरण्यात आलं तेव्हा त्याने माझं अकाउंट हॅक झाल्याचा कांगावा सुरु केला होता. तरीही त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून अनेक विरोधकांच्या बाबतीत संतापजनक आणि फेक पोस्ट दिसत होत्या. पोस्ट मध्ये महिलावाचक अपशब्द वापरल्याने संतापलेल्या मनसे महिला आघाडीने त्याचा ऑफलाईन शोध सुरु केला होता.

त्या भक्ताला मनसेच्या महिलांनी बदलापूरमध्ये गाठला. मनसे महिला आघाडीच्या कार्यकर्त्याचा संताप पाहून त्या विवेक भागवत नामक भक्ताची भंबेरीच उडाली. त्याने थेट सगळं मान्य करत माफीनामा दिला कि, ‘मी खोटी पोस्ट टाकली, माझ्या कडुन चुक झाली व माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले हे पण खोटे आहे.  राज साहेबांची व बदलापुर मनसे सैनिकांची जाहीर माफी मागतो’ असा पूर्ण कबुली नामा सुद्धा दिला.

विशेष म्हणजे सरळ खळखट्याक करणाऱ्या या मनसे महिला कार्यकर्त्यांनी त्या भक्ताला केवळ तो मराठी असल्याने हात न लावता तंबी देत सर्व कबुली घेतली. इतकंच नाही तर उद्या संकटात आलास तर राज ठाकरेच पुढे येतील आणि कोणीही मोदी किंवा मोदीभक्त येणार नाहीत अशी भावनिक जाणीव सुद्धा मराठी म्हणून करून दिली.

परंतु, मनसे महिला आघाडीच्या या अवताराने सर्व ऑनलाईन डिजिटल भक्तांना ऑफलाईन इशारा दिला गेला आहे. एकूणच फाजील भक्तांविरुद्ध मनसेने सुरु केलेलं हे ऑफलाईन आंदोलन, इतर पक्ष सुद्धा आत्मसात करतील आणि फेक अकाऊंचा वापर करून समाज माध्यमांवर हौदोस घालणाऱ्या भक्तांना धडा शिकवतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

काय आहे नेमका व्हिडिओ?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x