15 August 2022 9:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Financial Tips | आर्थिक स्वातंत्र्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा, सर्व आर्थिक चिंतांपासून होईल सुटका Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल
x

युती केली चूक झाली, आता २०२४च्या तयारीला लागा: रावसाहेब दानवे

Shivsena, BJP, Yuti, BJP MP Raosaheb Danve

नांदेड: भारतीय जनता पक्षाशी शिवसेनेची युती तुटल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी आमच्याशिवाय कोणी सत्तेत येणार नाही आणि विरोधीपक्ष पूर्णपणे नष्ट होणार याच अविर्भावात भारतीय जनता पक्षाचे नेते वावरत होते. अगदीच बोलायचे झाल्यास राज्यातील भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून २०-२५ जागाच मिळतील असं छातीठोक प्रसार माध्यमांना सांगत होते. मात्र निकालाअंती काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा शंभरच्या आसपास जाऊन पोहोचल्या आणि भारतीय जनता पक्ष १०५ जागांवर स्थिरावला.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या देखील जागा देखील घातल्या, मात्र भाजप १०५ जागांवर स्थिरावल्याने शिवसेनेने नेमका हेतू साधला आणि राज्यात आघाडीत सामील होण्याचा तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचा निश्चय केला. अब की बार २५० के पार अशा वास्तवाला विसंगत प्रतिक्रिया देणारे भाजपचे नेते सध्या प्रसार माध्यमांना टाळत आहेत, कारण शिवसेना असं पाऊल उचलेल याची त्यांना स्वप्नात देखील कल्पना नसावी. त्यामुळे सध्यातरी सर्वकाही हाताबाहेर गेल्याचे भाजपाच्या झोपेतून उठलेल्या नेत्यांनी मान्य केल्याचं दिसत आहे.

त्यामुळे शहाणे झालेले भाजपचे नेते पुढील निवडणुकीच्या तयारीला लागणं शहाणपणाचं आहे असं मान्य करू लागले आहेत. त्यालाच अनुसरून, चूक झाली आमच्याकडून, पुढे युती होणार नाही. आता ५ वष्रे पक्षाचे काम वाढवून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी आढावा बठकीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना केली.

दानवे यांनी मतदार संघनिहाय मोजक्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविली असती, तर ९ पैकी ८ जागा जिंकल्या असत्या; मात्र युती केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रचंड नुकसान झाले आणि पक्षाच्या नेत्यांनी नांदेडकडे लक्ष न दिल्यामुळे मृतप्राय झालेली काँग्रेस पुन्हा जिवंत झाली, असे स्पष्ट मत व्यक्त केले. या वेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढील काळात युती नकोच, असा नारा दिला तर काही कार्यकर्त्यांनी सत्तेत येण्यासाठी पुन्हा शिवसेनेशी समझोता करा, असाही सूर आळवला. निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन युती करावी लागली. गरज संपली की काही जण सोडून जातात, त्यामुळे दगाफटकाही झाला. आता युती नको, ही कार्यकर्त्यांची भावना ठीक आहे. यामध्ये बदल होईल किंवा नाही हे सांगता येत नाही; परंतु २०२४ साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असं आदेश त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी त्यांनी काही शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

हॅशटॅग्स

#RaoSahebDanve(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x