ठाणे: राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला कोरोनाची लागण
ठाणे, १४ एप्रिल: देशात करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या तुलनेत महाराष्ट्रातील करोना मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. ही बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने हे प्रमाण कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार मुंबई आणि परिसरासाठी एक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी एक अशा तज्ज्ञांच्या दोन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे विश्लेषण करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
दुसरीकडे कोरोनाची झळ आता राजकारण्यांना देखील घेरू लागली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात असणाऱ्या पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. सुदैवाने जितेंद्र आव्हाडांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यामधील नेते आनंद परांजपे यांना करोनाची लागण झाली आहे. आनंद परांजपे गेल्या काही दिवसांपासून राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संपर्कात होते. जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असताना राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची पुष्टी झाल्याने त्यांच्या संपर्कात असणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि कर्मचाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे.
मुंबई, ठाणे आणि पुण्यापाठोपाठ पालघर जिल्ह्यावरही करोनाचं संकट घोंघावत आहे. आज दिवसभरात पालघर जिल्ह्यात ११ नवे करोनाबाधित सापडल्याने पालघर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ५३वर गेली आहे. आज सापडलेल्या ११ नव्या रुग्णांपैकी १० रुग्ण हे पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका क्षेत्रातील आहेत. तर एक रुग्ण हा डहाणू तालुक्त्यातील असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
News English Summary: On the other hand, the coroner’s swing has now surrounded politicians. The elderly leader of NCP in Thane has been agitated due to corona infection. A few days back, Jitendra Awhad, who had contacted the Minister Jitendra Awhad, came to know about Corona. Fortunately Jitendra Awhad’s Corona report has come out negative. However, after this, the corona test of a prominent NCP leader in Thane has come out positive. It is learned that the leader will be taken to the hospital shortly after the ambulance.
News English Title: Story corona virus NCP Party biggest leader affected by corona Positive report Thane admitted hospital Covid19 News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा