27 July 2021 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

VIDEO - कोरोना धास्ती; अखंड भारत हिंदू महासभेची 'गोमूत्र पे चर्चा'.......सविस्तर वृत्त

Akhil Bharat Hindu Mahasabha, Gaumutra Par Charcha, News Latest Updates, Corona Virus panic

नवी दिल्ली, १४ मार्च: देशात सध्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या या रोगावर काळजी घेण्याव्यतिरिक्त दुसरं कोणताही औषध उपलब्ध नसल्याने जगाची काळजी वाढली आहे. चीनमधून सुरुवात झालेल्या या भीषण रोगाची लागण जगातील जवळपास १०० देशांमध्ये विविध प्रमाणात पसरली आहे आणि त्यात भारत देखील एक प्रभावित देश आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अशा चिंतेच्या विषयात देखील देशातील धामिर्क संघटना काय करतील याचा नेम नाही असंच म्हणावं लागेल आणि त्याला कारण देखील तसंच आहे. अखिल भारत हिंदू महासभेच्या एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. सदर कार्यक्रम “कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी’ आयोजित करण्यात आला होता. या महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी त्याचे आयोजन केल्याचे पोस्टरवरून लक्षात येतं.

“जसे आपण चहा पार्टी आयोजित करतो त्याप्रमाणे आम्ही गोमुत्र पार्टी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी माहिती देताना सांगितलं होतं. त्यांच्या मते गोमूत्र संबंधित उत्पादने खाल्ल्याने “कोरोनाव्हायरसपासून लोकांचे तारण होऊ शकते.” या कार्यक्रमाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये लोकांना चाय प्रमाणे एक पेय्य पिताना सर्वजण दिसत आहे. विशेष म्हणजे महासभेने संपूर्ण भारतभर असे कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. याआधी आसाममधील भाजपचे आमदार सुमन हरिप्रिया देखील म्हणाले होते की, ‘तुमच्या परिसरात गोमूत्र फवारल्यास तुम्ही कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकता. मात्र नेटिझन्सनी यावरून जोरदार खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळात आहे.

 

News English Summery: What is the preferred beverage at a Gaumutra Party? Netizens were rather horrified on Saturday after videos of an Akhil Bharat Hindu Mahasabha event showed those present partaking of an unidentified, but seemingly suspicious, liquid. To give a bit of context, the event had been organised in a bid to “neutralise the effect of coronavirus” and was to be akin to a “tea party”. Posters for the event suggested that it was being organised by Swami Chakrapani Maharaj, the president of the organisation.

 

Web News Title: Story Gaumutra Par Charcha twitter horrified by Akhil Bharat Hindu Mahasabhas unique tea party News Latest updates.

हॅशटॅग्स

#india(209)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x