14 November 2019 1:08 PM
अँप डाउनलोड

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक बजरंग'कडून स्व. अटलजींना समर्पित

जकार्ता : १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या बजरंग पुनियाने पहिल्याच दिवशी ६५ किलो वजनी गटात जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८ असे पराभूत केले आणि सुवर्ण पदकावर स्वतःच नाव कोरल आहे. बजरंग पुनियाने हे पहिले सुवर्णपदक स्व. अटलजींना समर्पित केल्याचे ट्विट केलं आहे.

या स्पर्धेतील भारताला मिळालेले हे पहिलं सुवर्ण पदक आहे. सामन्यात बजरंगने पहिल्यापासूनच ६-० अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या काही वेळाने जपानच्या ताकातानी याने पुन्हा उत्तम लढत देत सामन्यात ६-४ अशी रंगत आणली होती. परंतु सामन्याच्या शेवटी ११-८ अशा फरकाने भारताच्या बजरंग पुनियाने जपान विरुद्ध सामना जिंकला आणि भारताला या स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या