3 November 2024 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

CBI, ED सह सर्व तपास संस्थांच्या कार्यालयात CCTV बसवा | सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Supreme Court, Install CCTV cameras, CBI ED NIA Offices

नवी दिल्ली, ३ डिसेंबर: सीबीआय, ईडी आणि एनआयए सारख्या तपास यंत्राणांच्या कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरा (installation of CCTV camera) बसवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) दिले आहेत. न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन, न्यायमूर्ती के एम जोसेफ आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस (Justice Rohinton Fali Nariman, Justice KM Joseph and Justice Aniruddha Bose) यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, पोलीस ठाण्याचे मुख्य प्रवेशद्वार, सर्व कॉरिडोर, लॉबी, रिसेप्शन या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात यावेत. सीसीटीव्ही बसवण्याचे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सुनिश्चित करायला हवे. मानवाधिकाराचे उल्लंघन टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत. प्रत्येक ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग पुढच्या १८ महिन्यांपर्यंत उपलब्ध असायला हवं (Each audio-video recording should be available for the next 18 months), असंही कोर्टानं म्हटलंय. यासाठी सुप्रीम कोर्टाने आदेश देखील जारी केलेत.

दरम्यान, २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाने कोठडीतील अत्याचाराच्या वाढत्या घटनांसंदर्भात देशाच्या प्रत्येक पोलीस स्टेशन्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पंजाबच्या एका पोलीस अत्याचाराच्या घटनेत हा मुद्दा पुनर्जीवित करण्यात आला. यासोबतच एक अहवाल सादर करण्यासाठी दवे यांना ‘एमिकस’च्या रुपात नियुक्त करण्यात आलं होतं. अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्यासोबत काय काय पावलं उचलली जाऊ शकतात, हे पाहण्याचे आदेश एमिकस क्युरींना देण्यात आले होते.

 

News English Summary: The Supreme Court of India has ordered the installation of CCTV cameras in the offices of investigative agencies like CBI, ED and NIA. A bench comprising Justice Rohinton Fali Nariman, Justice KM Joseph and Justice Aniruddha Bose passed the order.

News English Title: Supreme Court directs to union government to install CCTV cameras in offices of CBI ED NIA News Updates.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x