15 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

Scooter Bikes on Ethanol | आता स्कूटर-बाइक फक्त इथेनॉलवर धावणार | लवकरच कायदा आणण्याची गडकरींची माहिती

Nitin Gadkari

मुंबई, १७ सप्टेंबर | केंद्र सरकार लवकरच एक कायदा तयार करणार आहे, त्यानुसार बाइक आणि स्कूटरसहित इतर दुचाकी वाहने फक्त इथेनॉलवर चालतील. त्यामुळे महाग इंधनाच्या समस्येपासून सुटका होईल. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी सांगितले की,‘मी लवकरच कायदा बनवणार आहे. त्यानंतर स्कूटर, बाइक, ऑटोरिक्षा आदी पेट्रोलवर चालणार नाहीत. ही वाहने ११० रुपयांच्या पेट्रोलच्या ऐवजी ६५ रुपये लिटरच्या १०० टक्के इथेनॉलवर चालतील. त्यामुळे पैसेही वाचतील आणि प्रदूषणही कमी होईल.’

आता स्कूटर-बाइक फक्त इथेनॉलवर धावणार, लवकरच कायदा आणण्याची गडकरींची माहिती  – Scooter bikes will run only on ethanol after law says union minister Nitin Gadkari :

गडकरींनी राजस्थानच्या दौसात ही घोषणा केली. ते दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेच्या दोन दिवसांच्या निरीक्षण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी हरियाणाच्या सोहना, दौसा आणि मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्या वेळी ते म्हणाले,‘एक्स्प्रेस-वेच्या बांधकामात पर्यावरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सौरऊर्जेचा वापर होत आहे. देशातून पेट्रोल, डिझेलचा वापर पूर्णपणे थांबवण्याचा माझा प्रयत्न आहे. देशातील शेतकरी पेट्रोल-डिझेलला पर्याय देतील. इथेनाॅलच्या वापरासाठी मी २००९ पासून प्रयत्न करत आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढले आहे. आधी त्यासाठी उसाचा वापर होत असे. आता मका, तांदूळ आणि गव्हाचा वापर केला जात आहे. त्यामुळे लवकरच पेट्रोलची जागा इथेनाॅल घेईल.

इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचीही तयारी : नितीन गडकरी:
देशात २२ ग्रीन हायवे तयार केले जात आहेत. त्यावर भटकी जनावरे येऊ शकणार नाहीत. इलेक्ट्रिक हायवे बनवण्याची तयारी. सर्वप्रथम दिल्ली-जयपूर मार्गावर तो तयार होईल. रेल्वेप्रमाणेच बस, ट्रकही विजेवर चालतील. देशात सध्या पाच लाख रस्ते अपघात होतात. त्यात दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. महामार्गांवर अपघाताच होऊ नयेत अशी स्थिती वर्ष २०३० पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्ली-कटरा एक्स्प्रेस-वे दोन वर्षांत लाँच होईल. त्यामुळे दिल्ली ते कटराचे अंतर ७२७ किमीवरून घटून ५७२ किमी होईल. सहा तासांत दिल्लीहून कटराला पोहोचता येईल. दिल्ली-चंदीगड, दिल्ली-डेहराडून आणि दिल्ली-हरिद्वार यादरम्यानही नव्या रस्त्यांवर काम होत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Scooter bikes will run only on ethanol after law says union minister Nitin Gadkari.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x