12 December 2024 9:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Hot Stocks | दिग्गज गुंतवणूकदाराने या कंपनीचे 2 लाख शेअर्स खरेदी केले, वेगाने परतावा देतोय हा स्टॉक, नाव नोट करा

Hot Stocks

Hot Stocks | भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी “Agarawal Industrial corporation” या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE निर्देशांकावर जाहीर बल्क डील डेटानुसार आशिष कचोलिया यांनी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे 200,000 शेअर्स खरेदी करून त्यात खूप मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक कंपनीच्या एकूण मालकी हिस्सेदारीच्या 1.38 टक्के आहे. आशिष कचोलिया यांनी हा स्टॉक सरासरी 569.89 रुपये प्रति शेअर बाजार भावाने खरेदी केला आहे. आशिष कचोलिया यांनी हे शेअर्स एकूण 11.4 कोटी रुपयांना खरेदी केले असून, त्यांच्या कडे आता कंपनीचा एकूण 1.38 टक्के वाटा आहे.

आशिष कचोलिया यांची गुंतवणूक :
आशिष कचोलीया भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आहेत. त्यांनी हा स्टॉक विकत घेतल्याची बातमी पसरताच अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE वर 7 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आणि शेअर्स 640 रुपयांवर ट्रेड करत आहेत. दिवसा अखेर ट्रेडिंग सेशनच्या शेवटी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये 4 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आणि शेअरची किंमत 624.65 रुपयांवर क्लोज झाली होती. 1 ऑगस्ट 2022 रोजी आशिष कचोलिया यांनी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये 3,72,128 शेअर्स खरेदी केले होते, त्यांचा कंपनीतील एकूण गुंतवणूक वाटा 2.57 टक्के होता. आशिष कचोलिया यांनी हे शेअर्स सरासरी 505 रुपये प्रति शेअर या किमतीला खरेदी केला होता. त्यांना ही खरेदी करण्यासाठी 18.97 कोटी रुपये गुंतवणूक करावी लागली होती.

एकूण परतावा :
चालू वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 55 टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्याचे दिसून येते. आशिष कचोलियाकडे सध्या अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे 5,72,128 शेअर्स म्हणजेच 3.95 टक्के गुंतवणूक होल्ड आहे. अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ही एकात्मिक पेट्रोकेमिकल कंपनी आहे. चालू वर्षात आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 55 टक्के पेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 वर्षाच्या सुरुवातीला, 3 जानेवारी 2022 रोजी, या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 401.60 रुपयांवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 624.65 रुपये होती. अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 80 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Famous investor Ashish Kacholia Has Invested in Hot Stock Of Agarawal Industrial corporation on 30 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x