20 April 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

अखेर मोदी सरकाकडून एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कंपन्या विक्रीला

Union Finance Minister Nirmala Sitharaman, Air India, Bharat Petroleum Corporation, Sell

नवी दिल्ली: कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया (Air India) आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन (Bharat Petroleum Corporation) या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, आर्थिक वर्षात करसंकलनात झालेली घट पाहून निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी अर्थमंत्र्यांनी आर्थिक मंदीबाबत भाष्य केलं. आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्यासाठी वेळेवर आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. अनेक क्षेत्र या मंदीतून सावरत आहेत. आपलं ताळेबंद सुधारा असं अनेक उद्योगांच्या मालकांना सांगण्यात आलं असून, त्यातील अनेकांनी नवी गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे, असंही त्या म्हणाल्या.

सितारमण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला (Times of India) दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. मार्च महिनाअखेरपर्यंत एअर इंडिया आणि भारत पट्रोलियम या कंपन्यांच्या विक्रीची प्रकिया पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले. चालू आर्थिक वर्षात करसंकलनात झालेली घट पाहून निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह असल्याचंही सितारमण यांनी सांगितलं.

या वर्षाअखेरपर्यंत या दोन्ही कंपन्या विकण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून मार्च २०२० पर्यंत कंपन्या विकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्यावर्षी सरकारने एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विक्रीसाठी काढला होता. मात्र, त्याला कोणीही प्रतिसाद दिला नाही. सरकारकडे एअर इंडियाचे १०० टक्के समभाग आहेत. दुसरीकडे भारत पेट्रोलिअम (BPCL) चं बाजार भांडवल सुमारे १.०२ लाख कोटी रुपये आहे. त्यातले ५३ टक्के शेअर्स विकून ६५,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचं करण्याचं सरकारचं नियोजन आहे.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x