तर पुढील वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकांना लस दिली जाणार | कंपनीचा दावा
मुंबई, १५ नोव्हेंबर: देशातील कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणावर मंदावला असला तरी, अद्याप देखील कोरोनाबाधितांच्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यां लोकांचा आकडा चिंता कायम ठेवणारा आहे. मात्र त्यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४३ हजार ८५१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात देखील लोकं मोठ्याप्रमाणावर घराबाहेर पडत असल्याने, संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील २४ तासांत देशभरात ३० हजार ५४८ नवे वे करोनाबाधित आढळले असून, एकूण ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान,फायजर कंपनीची कोरोना लस (Pfizer Covid19 Vaccine) तयार करत असलेल्या तज्ज्ञांनी एक सकारात्मक दावा केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारात तज्ज्ञांनी केलेल्या या दाव्यामुळे आशेचा किरण दिसून आला आहे. फायजर कंपनीची लस तयार करत असलेल्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर लोकांना लस दिली जाणार आहे. बायोएनटेकने फायजर कंपनीसह मिळून ही लस तयार केली आहे.
बायोएनटेकच्या सीईओंनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पुढचे काही महिने कठीण असू शकतात. एका वैद्यकिय परिक्षणादरम्यान ही लस ९० टक्के परिणामकारक ठरली. पण याचा परिणाम सद्य स्थितीतील कोरोनाच्या लाटेवर दिसून येणार नाही. मागच्या आठवड्यात फायजर कंपनीने लस सुरक्षित ठरल्याची घोषणा केली. पण अजूनही लसीची संबंधी अधिक माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. यातून लस सुरक्षित ठरत असल्याचे दिसून येईल.
News English Summary: Pfizer has made a positive claim by experts who make corona vaccines. This claim by experts in the growing corona has shown a ray of hope. According to scientists who are developing the Pfizer vaccine, a large number of people will be vaccinated by September-October next year. Bioentech has teamed up with Pfizer to develop the vaccine.
News English Title: Pfizer has made a positive claim by experts who make corona vaccines news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या