17 May 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

...तर मुस्लीम युवकांचं शिर कापून टाकलं जाईल: भाजप खासदार सोयम बापूराव

BJP

हैदराबाद : तेलंगणा येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार सोयम बापूराव यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने देशभर चर्चा रंगली आहे. जर कोणी मुस्लीम युवक आदिवासी मुलींच्या पाठीमागे लागला असेल तर त्याचे शिर कापून टाकलं जाईल असं वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. आदिलाबाद येथील खासदार सोयम बापूराव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे त्यात ते असं विधान करताना दिसत आहेत.

व्हिडीओ क्लीपमध्ये खासदार सोयम बापूराव म्हणतात की, मी मुस्लीम युवकांनो सांगतो. जर तुम्ही आदिवासी मुलींच्या मागे लागलात तर तुमचा शिरच्छेद करु, मी माझ्या जिल्ह्यातील अल्पसंख्याक युवकांना बजावून सांगतोय की आमच्या मुलींचा पाठलाग करु नका असं धमकीवजा इशारा खासदारांनी दिला आहे.

सोमवारपासून ही व्हिडीओ क्लीप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्याने भारतीय जनता पक्षाचे खासदार सोयम बापूराव खूप अडचणीत आले आहेत. ज्यात त्यांनी मुस्लीम युवकांना जर आम्ही तुमचा पाठलाग केला तर तुम्हाला अडचणीचं जाईल असा इशारा दिला. या व्हिडीओवरुन अल्पसंख्याक समुदायाकडून भारतीय जनता पक्षाचे खासदार सोयम बापूराव यांच्याविरोधात लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. खासदारांच्या विधानामुळे मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच वादग्रस्त विधान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x