20 May 2024 11:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच गो डिजिट कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गो डिजिट कंपनीचा IPO 15 मे ते 17 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ( गो डिजिट कंपनी अंश )

अँकर गुंतवणूकदार 14 मे पासून या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. कंपनीने अद्याप IPO साठी इश्यू प्राईस जाहीर केलेली नाहीये. ग्रे मार्केटमध्ये गो डिजिट IPO शेअर्स 50 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

गो डिजिट कंपनीच्या IPO चा आकार 1,125 कोटी रुपये आहे. कंपनीची प्रवर्तक असलेली गो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस आणि विद्यमान शेअरधारक 5.47 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकणार आहेत. गो डिजिट इन्फोवर्क्स सर्व्हिसेस कंपनीने गो डिजिट कंपनीचे 83.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

मॉर्गन सस्टॅन्ली, ICICI सिक्युरिटीज, अॅक्सिस कॅपिटल, HDFC बँक, IIFL सिक्युरिटीज यांना IPO इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आणि Link Intime India कंपनीला IPO चे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

गो डिजिट कंपनीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील गुंतवणूक केली आहे. मात्र IPO मध्ये ते कोणतेही शेअर्स विकणार नाही. एफएएल कॉर्पोरेशन फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स कंपनीने गो डिजिट कंपनीचे 45.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. याशिवाय कामेश गोयल आणि ओबेन व्हेंचर्स एलएलपी कंपनीने गो डिजिट कंपनीचे अनुक्रमे 14.96 टक्के आणि 39.79 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

गो डिजिट इन्शुरन्स कंपनीने आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये 122 कोटी रुपये तोटा नोंदवला होता. तर FY2022 मध्ये कंपनीला 295 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. FY22 मध्ये या कंपनीने 3,841 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. FY22 मध्ये कंपनीचे प्रीमियम उत्पन्न FY21 च्या तुलनेत 62 टक्क्यांनी वाढले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP Go Digit General Insurance Ltd 10 May 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x