19 September 2021 4:34 AM
अँप डाउनलोड

EWS आरक्षणाला विरोध नाही | पण याचा धोका SEBC ला होणार नाही याची हमी घेणार का?

Maratha Reservation, EBC, BJP MP Sambhaji Raje

पुणे, २४ डिसेंबर: आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWSचा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का? असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारच्या भूमिकेत आता आपल्याला गडबड दिसून येत असल्याचं खळबळजनक वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय. येत्या 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतलीय.

“कोर्टाने यापूर्वी एका प्रकरणात जर EWSचं आरक्षण घेतलं तर SEBCचं आरक्षण घेता येणार नाही, असा निकाल दिला आहे, असं सरकारी वकील अॅड. पटवालिया यांनी आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे येत्या २५ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार असताना जर यामध्ये काही घोटाळा झाला तर याला जबाबदार कोण असणार? मी परखडपणे सांगू इच्छितो की याला राज्य सरकारच जबाबदार असेल. त्यामुळे २५ तारखेच्या सुनावणीदरम्यान सरकार नक्की काय करेल याबाबत मलाच प्रश्नचिन्ह वाटतंय, असंही यावेळी संभाजीराजे म्हणाले.

 

News English Summary: Bharatiya Janata Party MP Sambhaji Raje Chhatrapati has taken a stand that the government should not take a policy decision on the economically weaker factor i.e. EWS. I am not against EWS reservation, but will the government guarantee that it will not endanger SEBC? This question was also asked by Sambhaji Raje. The issue of reservation for the Maratha community will now be heard on January 25.

News English Title: If There is any disturbance in Maratha Reservation due to Economic Backwardness Concessions says BJP MP Sambhaji Raje news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x