निवडणुकीतील अपयश | चंद्रकांत पाटील राजीनामा द्या | भाजपमधूनच विरोध सुरु
कोल्हापूर, १५ डिसेंबर: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून (results of 3 graduate and 2 teacher constituencies) राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला होता. कारण, भारतीय जनता पक्षाला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ देखील गमवावा लागला होता. पदवीधरच्या या तिनही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरला होता.
त्यात भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी भाजप सर्वच्या सर्व जागा जिंकणार असं म्हटलं होतं. मात्र धुळे-नंदुबारची एक जागा भाजप जिंकली ती देखील मूळ काँग्रेसमधील दिग्गज नेत्याच्या बळावर ज्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपात प्रवेश केला होता. त्यात भाजप पक्षाचं काहीच योगदान नव्हतं हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता भाजप मधून वरिष्ठ पदाधिकारीच चंद्रकांत पाटील यांना हटविण्याची मागणी करत आहेत.
आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’ अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे यावेळी चक्क त्यांच्या बालेकिल्ल्यातूनच ही मागणी होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा.
दरम्यान या नेत्यांनी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात येऊन दंड थोपटनार्या पाटील यांना कोल्हापुरातून म्हणजेच आपल्या होम पीचवरच आव्हान उभे केले आहे. पाटील यांनीही निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याने भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, असा आरोप कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News English Summary: Now, BJP state president Chandrakant Patil has demanded the resignation of the state president. What is special is that this time the demand is coming from their stronghold. Bharatiya Janata Party district general secretary Shivaji Buwa, former taluka president of Hatkanangle P. D. Patil has demanded the resignation of Chandrakant Patil. Explaining the background of this demand, he said that Chandrakant Patil should accept responsibility for the defeat in the graduate and teacher constituency elections and resign as the state president of the Bharatiya Janata Party.
News English Title: BJP party officers demand for Chandarkant Patil hatav campaign news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC