रासप आ. रत्नाकर गुट्टे ED कारवाईनंतर संकटात | जाणकरांचं राजकीय अस्तित्त्व पणाला
मुंबई, २४ डिसेंबर: रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीय. त्यांना शेतकरी आणि इतर उद्योगांच्या नावावर कर्ज घेणं भोवलं असून, अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता रात्री उशिरा ईडीने कारवाईत जप्त केलीय. रत्नाकर गुट्टेंची गंगाखेड शुगर्सची 225 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लुटून ती रक्कम आपल्या कंपनीत गुंतवल्याचाही गुट्टेंवर आरोप ठेवण्यात आलाय. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असून, ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेऊन गुट्टे यांनी आपल्या विविध कंपन्यात गुंतवणूक केली असून, गंगाखेडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटकही झाली होती. बीडमधील गुट्टेंच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली.
शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज लाटल्याचा रत्नाकर गुंट्टेंवर आरोप आहे. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड या कंपन्यांची परभणी, बीड आणि धुळे येथील तब्बल 255 कोटींची मालमत्ता जप्त केलीय.
शेतकऱ्यांच्या फसवणूक कर्ज प्रकरणात त्यावेळी जेलमध्ये असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपकडून निवडणूक लढविली होती आणि त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल १८ हजार ८९६ मतांनी पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी रत्नाकर गुट्टे जवळपास ४ महिने आधी परभणीच्या जेलमध्ये होते.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपने आम्हाला शंभर टक्के फसवलं असलं तरी शिवसेना-भाजप महायुतीतून रासप बाहेर पडलेली नाही असं जाणकार यांनी त्यावेळी म्हटलं होतं. शिवसेना-भाजपला 287 जागांवर मदत करणार आहोत, परंतु गंगाखेडची एक जागा आम्हाला लढवू द्या, असं म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आपली हतबलता व्यक्त केली होती. मात्र आता तो एकमेव आमदार देखील संकटात आल्याने जाणकरांचं राजकीय अस्तित्त्व पणाला लागल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.
News English Summary: RSP MLA Ratnakar Gutte’s troubles have increased once again. They are trying to take loans in the name of farmers and other industries. The property of Yogeshwari Hatcheries on Ambajogai Road was confiscated by the ED late last night. Ratnakar Gutte’s assets worth Rs 225 crore belonging to Gangakhed Sugars have been seized and he is accused of laundering loans in the name of farmers.
News English Title: ED action on RSP MLA Ratnakar Gutte regarding Yogeshwari Hatchery property news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN