15 December 2024 4:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

मुंबई-महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास | पोलिसांचं तोंड काळं झालं बोलणं फडणवीसांना शोभतं का

We trust, Mumbai and Maharashtra police, Anvay Naik family

मुंबई, ११ मार्च: मनसुख हिरेन प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रकारे विधानसभा हादरवून ठेवली तशीच भूमिका अन्वय नाईक प्रकरणात का घेतली नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. फक्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. पण विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी निकाल दिल्याचे सांगून दिशाभूल केली, असा आरोप अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले. या दोघींनी मनसुख हिरेन प्रकरणाचा दाखला देत भाजपला धारेवर धरले. एका व्यक्तीला दोन ते तीन दिवसांत न्याय मिळतो. फक्त संशयावरुन अधिकाऱ्याची बदली केली जाते. परंतु, आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावे स्पष्टपणे आहेत. मग तेव्हा भारतीय जनता पक्षाने विधानसभा हादरवून का सोडली नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला.

मुंबई-महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास:
अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ अन्वय नाईक यांनी उभारून दिला. त्याचे पैसे थकवल्यानं, गोस्वामींनी धमक्या दिल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाला ३ वर्ष उलटूनही अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांवर, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र पोलिसांचं तोंड काळं झालं असं फडणवीस म्हणतात. असं बोलणं फडणवीस यांना शोभतं का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आम्हाला ज्या धमक्या येत आहेत त्याचं काहीच नाही का? आम्हाला अद्यापही धमक्या दिल्या जात आहेत असं अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी सांगितलं. “अर्णब गोस्वामी जेलमधून बाहेर पडल्यावर सर्वांसमोर धमकी देत होता, आम्हाला दोन दिवस झोप लागली नाही,” असं त्या म्हणाल्या. आमची केस दाबली गेली असून त्याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

आमच्यावर हात टाकण्यात आला होता तेव्हा..
आमच्यावर हात टाकण्यात आला होता. तेव्हाच्या तपास अधिकाऱ्याला कोणाचा आदेश होता हेदेखील बाहेर काढावं. मी आणि आई मनाचं काही सांगत नाही आहोत. आम्ही संशय व्यक्त करत नसून सुसाईड नोटमध्ये नाव देण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्याला आमची चौकशी करण्याचा आदेश कोणी दिला होता? ज्यांना समस्या आहे त्यांनी चर्चेला बसावं.. चाय पे चर्चा होऊन जाऊ द्या,” असं आव्हान यावेळी आज्ञा नाईकने दिलं. तसंच किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो? असा सवाल विचारला. अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक यांनी यावेळी महाराष्ट्र पोलिसांचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगितलं. तसंच गरज लागल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ अशी माहिती दिली.

 

News English Summary: Naik set up Arnab Goswami’s Republic TV studio. After exhausting his money, Goswami threatened him and Naik committed suicide. We have not received justice in this case even after 3 years. We have full faith in the Mumbai Police and the Maharashtra Police investigating this case. However, Fadnavis says that the face of the police has turned black. He raised the question whether it is appropriate for Fadnavis to say such a thing.

News English Title: We trust on Mumbai and Maharashtra police said Anvay Naik family members news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x