13 April 2021 6:49 PM
अँप डाउनलोड

भिडेंचं अजब विज्ञान ! माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना मुलं होतात

नाशिक : शिवकालीन इतिहासाची दाखले देऊन सध्याच्या राजकीय परिस्थीवर भाष्य करणाऱ्या संभाजी भिडेंनी एक अजब दावा केला आहे. शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी हे विधान नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत केलं आहे ज्यामुळे त्यांच्यावर खूप टीका होताना दिसत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

उपस्थितांना संबोधित करताना संभाजी भिडेंनी दावा केला की, ‘माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते’. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळजवळ १५० जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली असं ते म्हणाले. लग्न होऊन सुद्धा १०-१५ वर्ष झालेल्या जोडप्याला पोर होत नाहीत अशा जोडप्याने ती फळ खाल्ली तर त्यांना नक्कीच पोर होतील.

पुढे ते म्हणाले की, हे सत्य मी माझ्या आई शिवाय केवळ तुम्हाला सांगतो आहे की ते आंबे कसे आहेत. ते खाल्याने ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल आणि अपत्यच नसेल तर ते सुद्धा होईल. म्हणजे माझ्या शेतातली आंब्यामध्ये नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देण्याची गुण आहेत असं अजब दावा संभाजी भिडेंनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Sambhaji Bhide(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x