16 April 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस Ambuja Cement Share Price | अदानी ग्रुपचा सिमेंट शेअर! कंपनीने नवीन अपडेट दिली, शेअर 35 टक्के वाढणार Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सची ट्रेडिंग रेंज 20-30 रुपये मध्ये अडकली, सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

भाजपात अंतर्गत कुरघोडी सुरु; मंगलप्रभात लोढांचं पद पुन्हा आशिष शेलारांकडे?

Mumbai BJP President Mangalprabhat Lodha, Ashish Shelar

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी लागल्यानंतर राज्य भारतीय जनता पक्षामध्ये देखील अंतर्गत कुरघोड्या सुरु झाल्याचं वृत्त आहे. त्यात शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने पक्षाला आक्रमक मुंबई प्रदेशाध्यक्षाची गरज असून नवा चेहरा मराठीच असावा असा आग्रह पुढे आला आहे. मंगलप्रभात लोढा हे मृदू भाषिक समजले जातात आणि आक्रमकपणा त्यांच्या स्वभावात नाही. त्यात गुजराती मतदार हा भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि त्यात मुंबई अध्यक्ष गुजराती ठेऊन मराठी मतदार लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे काल राज्यातील सर्व प्रमुख नेते दिल्लीत लॉबिंग करत होते आणि नवे अध्यक्ष येताच हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसेसोबत पुढे जायचे अंदाज येत असल्याने मराठी चेहरा अध्यक्षपदी बसविण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. त्यामुळे पुन्हा या पदावर नव्या नियुक्तीची चिन्हं आहेत. त्यासाठी मुंबई भारतीय जनता पक्ष पदावरुन आमदार मंगलप्रभात लोढा यांची गच्छंती होण्याचे संकेत मिळत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. मंगलप्रभात लोढांना हटवण्याची मागणी पक्षातून होत असल्यामुळे अध्यक्षपदी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी सहा वाजता प्रदेश कार्यालयात मुंबईतील आमदार, नगरसेवकांना पाचारण करण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनाही बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. या बैठकीत मुंबई भारतीय जनता पक्षाला नवे प्रदेशाध्यक्ष मिळू शकतात. मुंबई अध्यक्षपदासाठी आशिष शेलारांसोबत अतुल भातखळकर, पराग आळवणी यांचीही नावं चर्चेत आहेत.

 

Web Title:  Mumbai BJP President Mangalprabhat Lodha might be get ditched as BJP Mumbai President.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x