25 April 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

माजी मंत्री म्हणू नका? | चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

औरंगाबाद, १७ सप्टेंबर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा खरोखर वादळी ठरला. मराठवाडा मुक्तीदिनाच्या पार्श्वभूमीवर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या, विरोध करणाऱ्या एमआयएमला उत्तर दिलं, तर चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. मला कळलंय की चंद्रकांत पाटील तिन्ही पक्षापैकी एका पक्षात प्रवेश करतायत, असं ते म्हणाले.

माजी मंत्री म्हणू नका?, चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत – Chief Minister Uddhav Thackeray taunt BJP state president Chandrakant Patil on his statement :

मला माजी मंत्री म्हणू नका. पुढच्या दोन-तीन दिवसांत बघा काय होतंय, असं म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे कालपासून अर्थ अन्वयार्थ लावले जात होते. शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चाही होत होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मिश्किल उत्तर दिलं.

चंद्रकांत पाटील यांनी काल मला माजी मंत्री म्हणू नका, असं म्हटलं. माझ्या कानावर असं आलंय की चंद्रकांतदादा तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार आहेत, असं म्हणताना मुख्यमंत्रीही हसले. उपस्थित पत्रकारांनाही मुख्यमंत्र्यांनी हसायला भाग पाडलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Chief Minister Uddhav Thackeray taunt BJP state president Chandrakant Patil on his statement.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x