12 August 2020 12:33 PM
अँप डाउनलोड

भाजपाची अवस्था पाहून सुषमा स्वराजांनी लोकसभेचं मैदान सोडले : चिदंबरम

नवी दिल्ली : भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय काल इंदूर येथे जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी खोचक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “सुषमा स्वराज या स्मार्ट असून मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची स्थिती अत्यंत वाईट असल्याने त्यांनी निवडणुकीचे मैदान सोडून दिल्याचे ट्विट केले आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

परंतु, त्यानंतर लगेचच केलेल्या दुसऱ्या एका ट्विटमधून चिदंबरम यांनी सुषमा स्वराज यांच्या कामाचे कौतुक सुद्धा केले आहे. त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना सुद्धा केली. ते म्हणाले, “श्रीमती सुषमा स्वराज यांनी देशाची विनम्रतेने सेवा केली आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना” असं म्हटलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#P Chidambaram(14)#Sushma Swaraj(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x