25 April 2024 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

राज्यात दुष्काळ असताना सत्ताधारी राम मंदिरावरून वातावरण दूषित करत आहेत

मुंबई : सध्या राज्यात दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी तसेच शेती व्यवसाय संकटात आहे आणि त्यामुळे आत्महत्या सुद्धा वाढत आहेत. परंतु केंद्रातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्याबद्दल जराही आस्था राहिलेली नाही. कारण राज्यातील दुष्काळावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी पक्ष केवळ राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात जाणीवपूर्वक दुषित वातावारण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात भर म्हणजे घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या सर्व बाजूनी दुबळ्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया, असा थेट हल्लाबोल एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी सरकावर केला.

दरम्यान, आगामी निवडणुकीत प्रतिगामी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी देशातील आणि राज्यातील सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन पवारांनी उपस्थितांच्या समोर केले. काल अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी परिषदेला काँग्रेस, एनसीपी आणि शेकापच्या नेत्यांना संबोधित करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते त्यावेळी पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना सर्व मुद्दे उपस्थित केले.

पवारांसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्षनेचे राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, पश्चिम बंगालमधील माकपचे खासदार हन्नन मुल्ला, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. तर आयोजीत परिषदेच्या अध्यक्षस्थानी अशोक ढवळे होते. दरम्यान, याचवेळी येत्या २९ आणि ३० नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च थेट दिल्लीला धडकणार असल्याचे या वेळी सर्वांसमोर जाहीर करण्यात आले.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x