4 August 2020 1:55 PM
अँप डाउनलोड

शरद पवार पंतप्रधान व्हावे ही मनसेची प्रामाणिक इच्छा : बाळा नांदगावकर

कऱ्हाड : देशभरात मोदींविरोधात तिसरी आघाडी जोर धरू लागल्याने तसेच त्या तिसऱ्या आघाडीचे नैतृत्व शरद पवारांसारख्या अनुभवी राजकारण्याने करावे अशी राजकीय चर्चा अनेक पक्ष करत आहेत आणि त्यासाठी दिल्लीत गाठीभेटीचे सत्र सुरु झाले आहे. सर्व पक्षांची मोठं बांधण्यात सध्याच्या घडीला शरद पवार हेच उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, जर भविष्यात एक मराठी अनुभवी राजकारणी पंतप्रधानपदी विराजमान होणार असेल तर मनसे पक्ष नेहमीच शरद पवारसाहेबांच्या पाठीशी एक मराठी माणूस म्हणून नेहमीच ठाम पणे उभा राहील. बाळा नांदगावकर सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते कऱ्हाड मधील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार ही दोन्ही नैतृत्व प्रचंड लोकप्रिय असून, एक तडफदार तरुण नेता आणि दुसरे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जाणता नेता म्हणून ओळख असलेले शरद पवार जर एकत्र आले तर बरीच राजकीय उलथापालथ होऊ शकते असे जाणकारांचे मत होते. दोन्ही पक्षांची विचारधारा जरी वेगळी असली तरी राज ठाकरे आणि शरद पवार हे राजकारणातले समजूतदार नेते म्हणून परिचित आहेत. दोघेही राजकारण आणि व्यक्तिगत नात्यात कधीच गल्लत करत नाहीत.

परंतु राज ठाकरे यांनी शरद पवारांची घेतलेल्या मुलाखतीमागे कोणतेही राजकारण नव्हते अशी प्रतिक्रिया ही बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना दिली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thakarey(78)#Sharad Pawar(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x