15 December 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 5 टक्के अप्पर सर्किटसह 29.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

या कंपनीने नुकतीच कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. या कंपनीवर सुमारे 800 कोटी रुपये कर्ज होते. मार्च 2024 तिमाहीमध्ये रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीला 397.66 कोटी रुपये तोटा झाला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत रिलायन्स पॉवर कंपनीला 321.79 कोटी रुपये नफा झाला होता. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 0.27 टक्के वाढीसह 29.77 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीचे एकूण उत्पन्न जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत 2,193.85 कोटी रुपये नोंदवले गेले होते. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत रिलायन्स पॉवर कंपनीने 1853.32 कोटी रुपये कमाई केली होती. मार्च तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीच्या इंधनाचा खर्च वाढून 953.67 कोटी रुपये होता. जो आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जानेवारी-मार्च तिमाहीत 823.47 कोटी रुपये नोंदवला गेला होता. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा तोटा वाढून 2,068.38 कोटी रुपये नोंदवला गेला होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या कंपनीला 470.77 कोटी रुपये तोटा झाला होता.

रिलायन्स पॉवर कंपनीने डिसेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान IDBI बँक, ICICI बँक, Axis बँक आणि DBS यासह विविध बँकाचे कर्ज सेटलमेंट केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीने अरुणाचल प्रदेशमध्ये 1. 200 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाचे विकास हक्क THDC कंपनीला 128 कोटी रुपये मूल्यावर विकले आहे. मार्च 2024 मध्ये या कंपनीने महाराष्ट्रातील 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प 132 कोटी रुपयेला JSW रिन्युएबल एनर्जी कंपनीला विकला आहे. या प्रकल्पांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम कंपनीने आपले सर्व कर्ज फेडणासाठी खर्च केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 26 July 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x