नवी दिल्ली : भारताच्या राजकारणात दोन महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले तर दुसरीकडे शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड दिल्लीमध्ये चर्चा झाली. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव मायावतींच्या घरी गेले आहेत ते तब्बल २३ वर्षांनी.
शरद पवार आणि राहुल गांधींमध्ये बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाली. उत्तर प्रदेशच्या काल पार पडलेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात भाजप आणि योगी सरकार चांगलेच तोंडघशी पडले आहे. त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीने सपा आणि बसपा यांच्या युतीने आनंदाचे वातावरण संपूर्ण उत्तर प्रदेशात पाहावयास मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्वच विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते त्यावेळी शरद पवार यांनी सुद्धा हजेरी लावली होती.
यूपीतील पोटनिवडणुकीतून विरोधकांचं चांगलच मनोमिलन झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
