19 April 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

पेट्रोलची सेंचुरी | पंपचालकांच्या जुन्या मशीनमध्ये ३ डिजिट दिसेना | विक्री बंद

Price of petrol, hundreds rupees

मुंबई, १४ फेब्रुवारी: कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना इंधनाच्या चढत्या दरांचा देखील फटका बसणार आहे.कारण, सरकारी तेल कंपन्यांकडून आज (१४ फेब्रुवारी) सलग ६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, पेट्रोलच्या किंमतीने आता ‘शंभरी’ गाठली आहे. प्रीमियम पेट्रोलचा दर हा प्रति लीटर तब्बल १०० रुपयांच्या पार गेला आहे.

पेट्रोलचे दर १०० पार गेले असले तरीही अनेक पेट्रोल पंपावर असलेल्या जुन्या मशीनमध्ये ३ डिजिट दाखवले जात नाहीत. त्यामुळेच आता अनेक पेट्रोल पंपावर पंपचालकांकडून प्रीमियम पेट्रोलची विक्री बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, १०० पार गेलेल्या पेट्रोलच्या किंमतींमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. मात्र, पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याबाबत सध्या कोणताही निर्णय अथवा विचार नसल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत सांगितले आहे.

मुंबईत पेट्रोल प्रति लीटर 95 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. तर दिल्लीत पेट्रोल 88.73 आणि डिझेल 79.06 रुपये झाले आहे. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये तीन कंपन्यांचे 398 पेट्रोल पंप आहेत. यातील अनेक पंपावर नवीन मशीन लावण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी तीन डिजिटचा नंबर दाखवण्यात अडचणी येत आहेत. ज्या मशीनवर नवा डिजिटल डिस्पेंसर लावण्यात आला आहे तिथे ही समस्या दाखवणार नाही. मात्र काही ठिकाणी अद्यापही अडचण येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

News English Summary: Rising fuel prices will also hit the economy during the Corona period, when state-owned oil companies hiked petrol and diesel prices for the sixth consecutive day today (February 14). Therefore, the price of petrol has now reached ‘hundreds’. The price of premium petrol has crossed Rs 100 per liter.

News English Title: Price of petrol has now reached hundreds rupees news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x