18 May 2022 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PNB MetLife Dental Health Insurance | आता डेंटल केअर इन्शुरन्स प्लॅन देखील घेता येणार | फायदे जाणून घ्या Ethos IPO | आजपासून इथॉस आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी | तपशील जाणून घ्या Hot Stocks | या 3 शेअर्सनी गुंतवणूकदारांना केवळ 3 दिवसात मजबूत परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या Multibagger Stock | या 15 रुपयाच्या शेअरने १ लाखाच्या गुंतवणुकीचे 15 लाख रुपये केले | स्टॉकबद्दल जाणून घ्या Stocks To Buy Today | या 5 शेअर्समधून 1 आठवड्यात कमाईची मोठी संधी | ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा Fuel Prices | मोदी सरकार जनतेला अजून धक्का देण्याच्या तयारीत | पेट्रोल-डिझेलच्या दरात 4 रुपयांनी वाढ होणार
x

तिच्या अंगावर पोल्ट्री फार्मचं कर्ज | २५ लाखाच्या नुकसानामुळे ती त्रस्त होती - वडिलांची प्रतिक्रिया

Pooja Chavan, Banjara Samaj, MInister Sanjay Rathod

मुंबई, १४ फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष केलं आहे. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली असं सांगून याला जातीय वळण देखील देण्यात येत आहे.

याप्रकरणात राज्याचे वन मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपकडून आरोप करण्यात आले आहेत. शिवसेनेचे अनेक नेते सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया देतं आहेत तसेच याबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असल्याने पोलीस यंत्रणा देखील सखोल चौकशी करत आहे. घडलेल्या घटनेची तांत्रिक बाजू पाहता पूजा चव्हाणने आतमहत्यापुर्वी कोणतीही चिट्ठी लिहून ठेवली नव्हती. तसेच ऑडिओ रेकॉडींगला पुरावा मानलं जाऊ शकत नाही कारण त्याबाबत न्यायालयाच्या काही गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे गुन्हा नोंदवणं शक्य नाही.

मात्र आता भाजप नेत्यांचं तोंड बंद होण्याची शक्यता आहे. कारण प्रसार माध्यमांच्या माध्यमातून भाजप नेत्यांनी अनेक तर्क वितर्क जोडले, मात्र आता पूजाच्या वडिलांनी खरं कारण समोर आणलं आहे ज्याची कोणतीही वाच्यता झालीच नव्हती.

पूजाच्या वडिलांनी प्रथम माध्यमांना विनंती केली आहे की आमच्या मुलीची बदनामी थांबवावी. त्यांनी प्रसार माध्यमांपुढे व्यक्त होताना सांगितलं की, पूजा ही धैर्यवान मुलगी होती. आमच्या कुटुंबाने नुकतंच एक पोल्ट्री-फार्म सुरु केलं होतं. त्याचं कर्ज पूजाच्या नावाने होतं. मात्र कोरोना आणि बर्ड-फ्लू संकटामुळे आम्हाला गेल्या वर्षी आम्हाला २०-२५ लाखांचं नुकसान झालं आणि यावर्षीही आम्हाला तेवढंच मोठं नुकसान झालंय. त्यात ते कर्ज पूजाच्या नावावर असल्याने कर्ज देणाऱ्या संस्थांनी तिच्या वारंवार तगादा लावल्याने ती प्रचंड टेन्शनमध्ये होती. त्यामुळे याच दबावाखाली तिने आत्महत्या तर केली नाही ना अशी शक्यता तिच्या वडिलांनी खुद्द व कॅमेरा व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

काय आहे ती संपूर्ण प्रतिक्रिया:

 

News English Summary: Pooja’s father has first requested the media to stop defaming our daughter. “Pooja was a brave girl,” she told the media. Our family had just started a poultry-farm. His debt was in the name of worship. But the corona and bird-flu crisis has cost us Rs 25 lakh. She was under a lot of tension as she was repeatedly harassed by the lending institutions as it was in the name of debt worship. Therefore, her father himself and the camera have expressed the possibility that she did not commit suicide under this pressure. So this case is likely to get a twist.

News English Title: Pooja Chavan said fact about actual reason behind her stress before death news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x