डहाणू : दूध दरासाठी राज्यातील दूध उत्पादक अजून आक्रमक झाले आहेत. कारण गुजरातवरून येणारे दुधाचे टँकरही अडवायला स्वतः खासदार राजू शेट्टी डहाणू स्टेशनवर ठाण मांडून आहेत. अहमदाबाद-मुंबई पॅसेंजरने अमूल दूध पुरवठा करणार असल्याचे समजल्याने राजू शेट्टी स्वतः ते रोखण्यासाठी डहाणू स्टेशनवर ठाण मांडून आहेत.

दूध उत्पादकांच आंदोलन असच तीव्र होत राहिल्यास उद्या परिस्थिती चिघळू शकते. कारण बुधवारी मुंबईला दूध पुरवठा होऊ शकेल मात्र उद्या, गुरुवारपासून दुधाचा तुटवडा जाणवायला सुरुवात होईल. त्यामुळे मुंबईकरांची उद्यापासून मुंबईकरांची खऱ्या अर्थाने दूध कोंडी होऊ लागेल अशी परिस्थती निर्माण झाली आहे.

आधीच नागपूरला मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीचा साथ आज संपण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून उद्या पासून खऱ्या अर्थाने मुंबईकरांची दूध कोंडी होणार आहे.

MP Raju shetty at Dahanu railway station to stop Ahmadabad mumbai passenger train