16 December 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

पुणे | कोरोनामुळे लॉकडाउन नाही | पण 31 मार्च पर्यंत केवळ कडक निर्बंधांची घोषणा

Corona Crisis, Pune, Lockdown

पुणे, १२ मार्च: पुण्यात लॉकडाउनच्या चर्चा सुरू असतानाच विभागीय आयुक्तांनी लॉकडाउन लागणार नाही असे गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. त्यामध्ये सरसकट लॉकडाउन न लावता केवळ कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, यात विरोधी पक्षासह दोन खासदार सुद्धा होते. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात आला. माझी तमाम महाराष्ट्र आणि पुण्याच्या जनतेला आवाहन आहे, की कोरोना आणि त्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांना गांभीर्याने घ्या. लसिकरणाला प्रतिसाद द्या. लोक नियमांचे पालन करत नसल्याने आपल्याला कडक निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतची संचारबंदी अत्यावश्यक सेवा सोडून आपण लागू केली आहे.

पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी जारी केलेल्या माहितीनुसार, आजपासून 31 मार्च पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांसह सार्वजनिक कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तर अंत्यविधी आणि इतर कार्यक्रमांसाठी 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमता येणार नाही. 31 मार्च पर्यंत हॉटेल आणि मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु, या दरम्यान त्यांना 50 टक्केच आसनक्षमता ठेवावी लागणार आहे. रात्री 10 ते 11 या दरम्यान हॉटेल सुरू राहतील पण, त्यांना ग्राहकांना बसवता येणार नाही. या काळात ते केवळ होम डिलिव्हरी करू शकतील. उद्याने सुद्धा केवळ सकाळी सुरू आणि संध्याकाळी बंद ठेवले जातील.

 

News English Summary: While discussing the lockdown in Pune, the divisional commissioner clarified at a press conference on Thursday that there would be no lockdown. A meeting of Pune administrative officers was held under the chairmanship of Guardian Minister Ajit Pawar. BJP leader Chandrakant Patil was also present. It has been decided to impose only strict restrictions without any lockdown.

News English Title: Pune government decided to impose only strict restrictions without any lockdown news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x