14 December 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

तथ्यहीन वृत्त आणि उतावळ्या पोस्ट | थेट पोलिसाला, अधिकाऱ्याला कपडे काढून चोप देण्याची भाषा

Ashadeep Government Hostel, Rupali Patil, facebook post

मुंबई, ०४ मार्च: जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधानसभेत केली होती. अधिवेशनाच्या काळात अशी निराधार वृत्त देताना विरोधकांना खाद्य मिळेल आणि सेल्फ ब्रॅण्डिंग करता येईल.

शासकीय आशादीप महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध काल प्रसिद्ध केलं. त्याचे थेट पडसाद विधिमंडळात उमटले. अशा प्रकारची वृत्त अधिवेशनाच्या काळात अचानक समोर येऊन त्याची चर्चा विधिमंडळात होणं नवं राहिलेलं नाही. जाणीवपूर्वक तथ्यहीन वृत्त देऊन ते अधिवेशनात विरोधकांना खाद्य म्हणून पुरवलं जातं. त्यात ठोस पुरावे देखील नसताना थेट एखाद्या सुरक्षा यंत्रणेवर भीषण आरोप करताना कोणताही मागचा पुढचा विचार केला जात नाही हे देखील भीषण आहे.

मुळात संबधित शासकीय आशादीप महिला वसतिगृहात असल्याने त्यात पुरुष पोलीस जास्तीत जास्त इमारतीच्या बाहेर राहू शकतात. मात्र आत त्यांना देखील प्रवेश नसतो आणि असला तरी तो महिला पोलिसांना असतो, त्यामुळे पोलिसांवर गंभीर आरोप करताना हा विचार देखील केला गेला नाही. केवळ बातमी पसरल्यावर आमच्या वृत्तानंतर विधिमंडळात पडसाद उमटले असे सेल्फ ब्रॅण्डिंगचे प्रकार मागील काही काळापासून सुरु आहेत. पण भरडले जातं आहेत ते पोलीस आणि ते देखील नाहक. वास्तविक ज्या मुलीने सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केली, त्याच मुलीने तीन गरोदर मुलींना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. मात्र या कार्यक्रमात झालेल्या त्याच वसाहतीतील कार्यक्रमाच्या दरम्यान झालेल्या अंतर्गत गोंधळात पोलिसांना नाहक गोवलं आणि विरोधकांनी देखील त्यावर विश्वास ठेवून सर्व अंतिम सत्य असल्याचा कांगावा विधिमंडळात केला.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी महिलांचं वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचं सांगत, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती दिली.

वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली. महिलांचं वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांन दिला असून तो मी पटलावर ठेवतो,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

तत्पूर्वी याच विषयाला अनुसरून मनसेच्या पुण्यातील पदाधिकारी रुपाली पाटील यांनी एक धक्कादायक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी ‘अन्यथा’ असा शब्द वापरत थेट पोलिसांना चोप देण्याची भाषा केली होती. त्यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं होतं की, “जळगाव महिला वसतिगृह मध्ये पोलीसा समोर महिलेला कपडे काढून नाचवत आहे….त्या पोलिसाला आणि महिला वसतिगृह लावणारे डिपार्टमेंट जवाबदार आहे…..पोलीस व अधिकारी त्वरित निलंबित करा…. अन्यथा आता आम्हाला त्या पोलिसाला आणि संबंधित अधिकारीला कपडे काढून मनसे चोप द्यावा लागेल.

जळगाव महिला वसतिगृह मध्ये पोलीसा समोर महिलेला कपडे काढून नाचवत आहे
त्या पोलिसाला आणि महिला वसतिगृह लावणारे डिपार्टमेंट…

Posted by Rupali Patil Thombare on Tuesday, March 2, 2021

व्यवसायाने वकील असलेल्या रुपाली ठोंबरे यांनी कोणतीही शहानिशा न करता पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना चोप देण्याची भाषा करत त्यात मनसे पक्षाचा देखील उल्लेख केला. मात्र आज तथ्य समोर आल्यानंतर तरी त्यांना आपण काय बोललो याची प्रचिती येउ दे म्हणजे झालं.

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh had announced in the Assembly yesterday that action would be taken against the culprits in the next two days by four senior officials in the case of forcing girls to dance in the Ashadeep Government Hostel in Jalgaon. Opponents will get food and self-branding while giving such baseless news during the convention.

News English Title: Case of Ashadeep Government Hostel in Jalgaon MNS leader Rupali Patil facebook post on Police news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x