12 December 2024 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मराठा आरक्षण : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशावर बुधवारी अंतरिम आदेश

Supreme Court, Hearing, Maratha Reservation

नवी दिल्ली, ७ जुलै : मराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय दिला नाही, तर येत्या बुधवारी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अंतरिम आदेशावर सुनावणी होईल, असे सांगितले. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणी होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोणत्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही असे मत व्यक्त केले. न्यायालय नियमित सुरु झाल्यावर मराठा आरक्षण सुनावणीवरील निकाल देता येणार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आजच्या सुनावणीबाबत बोलताना सांगितले, ‘आज न्यायालयाने मराठा आरक्षणाला कोणतीही स्थगिती दिली नाही, त्याबाबत समाधान आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत बुधवारी अंतरिम आदेश येईल. तर मराठा आरक्षणाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठासमोर ठेवायचे की नाही याबाबत मुख्य सुनावणी होण्यापूर्वी एक सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले आहे. निश्चितच हे प्रकरण मोठ्या खंडपीठासमोर जाईल’, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीराजेदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सुनावणीत सहभागी झाले होते. सुनावणीनंतर ते म्हणाले की, “अंतरिम आदेशावर बुधवारी चर्चा होईल. सविस्तर चर्चा पुढील महिन्यात सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी वकिलांना आपले मुद्दे लेखी देण्यास सांगण्यात आलं आहे. मराठा आरक्षण इतका मोठा विषय आहे की व्हर्च्यूअल माध्यमातून सर्व गोष्टी सादर करणं शक्य होणार नाही. यासाठी सप्टेंबरमधील तारीख मागण्यात आली. हा फार संवदेनशील विषय असल्याने समोरासमोर सुनवाणी होणं गरजेचं आहे असं मत आहे,”

 

News English Summary: A hearing on Maratha reservation was held in the Supreme Court today through video conferencing. The court did not rule on the Maratha reservation at this time, but said an interim order on admission to postgraduate medical courses would be heard next Wednesday.

News English Title: Supreme Court Hearing On Maratha Reservation News latest Updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x